Prakash Ambedkar | अजित पवार गेल्यावर शरद पवारांकडं काय राहिलं? – प्रकाश आंबेडकर

Prakash Ambedkar | सोलापूर: गेल्या काही दिवसांपूर्वी अजित पवार (Ajit Pawar) शरद पवारांची (Sharad Pawar) साथ सोडून राज्य सरकारमध्ये सामील झाले आहे.

अजित यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादीचे बहुतांश आमदार अजित पवार गटामध्ये सामील झाले आहे. याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

अजित पवार भाजपमध्ये गेल्यानंतर शरद पवारांकडं काय शिल्लक राहिलं? असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या या प्रश्नानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) म्हणाले, “शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनुभवी आणि ज्येष्ठ नेते आहे.

मात्र, अजित पवारांनी बंडखोरी केल्यानंतर त्यांच्याकडं पक्ष म्हणून काहीचं शिल्लक राहिलेलं दिसत नाही. अजित पवार जाताना सर्व काही त्यांच्या सोबत घेऊन गेले आहेत.

त्यामुळं शरद पवारांचं पक्षातील आणि जनतेतील वजन कमी झाल्याचं दिसून आलं आहे. अजित पवार आणि राष्ट्रवादीचे काही नेते जरी भाजपसोबत गेले असले तरी ते भ्रष्टाचाराच्या आरोपातून मुक्त होऊ शकणार नाही.”

The state government will not dare to arrest Sambhaji Bhide – Prakash Ambedkar

यावेळी बोलत असताना प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी संभाजी भिडे यांच्या वक्तव्यावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “राज्य सरकार संभाजी भिडे यांना अटक करण्याची हिम्मत दाखवू शकणार नाही.

कारण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः संभाजी भिडे यांच्या पाया पडतात. त्याचबरोबर राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेनेचे बहुतांश लोक भिडे यांच्या पाठीशी असल्यानं त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होऊ शकत नाही.”

दरम्यान, संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. महात्मा गांधीजींचे खरे वडील करमचंद गांधी नसून एक मुस्लिम जमीनदार असल्याचं भिडे यांनी म्हटलं होतं.

त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलं तापलं होतं. भिडेंच्या वक्तव्यानंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलंच घेरलं होतं.

सत्ताधारी भिडेंना संरक्षण देत असल्याचं विरोधकांनी म्हटलं होतं. याच पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.