Bhalchandra Nemade | टीम महाराष्ट्र देशा: सध्या औरंगजेबाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसले आहेत. याच पार्श्वभूमीवर ज्ञानपीठ पुरस्कार विजेते भालचंद्र नेमाडे यांनी केलं वक्तव्य केलं आहे.
औरंगजेबाला सर्व हिंदू द्वेष्टा ठरवतात. मात्र, औरंगजेब हिंदु द्वेष्टा नव्हता, असं वादग्रस्त वक्तव्य भालचंद्र नेमाडे यांनी केलं आहे. नेमाडे यांच्या या वक्तव्यानंतर राज्यात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता झाली आहे.
At that time there was no distinction between Hindus and Muslims – Bhalchandra Nemade
भालचंद्र नेमाडे (Bhalchandra Nemade) म्हणाले, “त्याकाळी हिंदू आणि मुसलमान भेद नव्हता. सगळ्यांच्या हिंदू राण्या असायच्या. त्याचप्रमाणे औरंगजेबाला देखील दोन हिंदू राण्या होत्या. तर अकबराची एक बायको देखील हिंदू होती.
त्यावेळी औरंगजेबाच्या दोन्ही हिंदू बायका काशीला गेल्या होत्या. मात्र, त्या तिथून परत आल्याच नाही. त्यानंतर औरंगजेबाने या प्रकरणाचा शोध घ्यायला सुरुवात केली.
त्यात त्याला कळलं होतं की, काशीतील काही पंडे तिथे आलेल्या बायकांना एका भुयारात नेऊन भ्रष्ट करायचे. औरंगजेबाच्या दोन्ही बायकांसोबत हेच झालं.
त्यामुळं औरंगजेबानं काशीतील मंदिर फोडलं. या घटनेनंतर काही इतिहासकारांनी औरंगजेबाची हिंदू द्वेष्टा म्हणून नोंद केली. मात्र, औरंगजेब हिंदु द्वेष्टा नव्हता. या सर्व गोष्टी इतिहास वाचल्याशिवाय कळत नाहीत.
“औरंगजेबाच्या काळामध्ये हिंदू सरदार वाढले होते. औरंगजेबाच्या काळात निम्म्याहून अधिक हिंदू सरदार होते. मग औरंगजेबाला हिंदु द्वेष्टा वगैरे कसं म्हणता येईल?
मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयात तुम्ही आलात, पुस्तक वाचली तर तुम्हाला काय खरं आणि काय खोटं ते कळेल. बाहेर घडणाऱ्या सगळ्याच गोष्टी खऱ्या नसतात. पुस्तक वाचल्यावर तुम्हाला काय खरं ते कळेल”, असही ते (Bhalchandra Nemade) म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- Rohit Pawar | “अन्याय पद्धतीने काढलेली खासदारकी…”; राहुल गांधींना खासदारकी मिळाल्यावर रोहित पवारांची प्रतिक्रिया
- Eknath Shinde | “आधी वाघाची डरकाळी तर आता नागाची फुसफुस ऐकू…”; शिंदे गटाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
- Sanjay Shirsat | “सोनियाचा दिवस कधी येणार याची वाट…”; संजय शिरसाटांची उद्धव ठाकरेंवर टीका
- Ambadas Danve | “आमचा नेता आजही बलशाली…”; बावनकुळेंच्या टीकेला अंबादास दानवेंचं प्रत्युत्तर
- Ashish Shelar | उद्धव ठाकरेंची ओळख म्हणजे घरबशा मुख्यमंत्री – आशिष शेलार