Rohit Pawar | टीम महाराष्ट्र देशा: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना मोदी आडनाव प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर गुजरात उच्च न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली होती.
गुजरात उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरुद्ध राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. राहुल गांधींच्या या याचिकेवर सुप्रीम कोर्टाने काही दिवसांपूर्वी निकाल दिला आहे.
कोर्टाने राहुल गांधींची शिक्षा स्थगित केली आहे. यानंतर राहुल गांधींना पुन्हा एकदा खासदारकी मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ट्विट करत रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले, “अन्यायी पद्धतीने काढलेली खासदारकी न्यायालयाच्या माध्यमातून पुन्हा मिळाल्याने, संसदेत लोकशाहीचा आवाज पुन्हा अधिक बुलंद होणार आहे!
शिवाय जनतेचा आवाज बंद करण्याचा प्रकार पुन्हा होऊ नये, म्हणून येत्या निवडणुकीत लोकांच्या माध्यमातून परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही!”
अन्यायी पद्धतीने काढलेली खासदारकी न्यायालयाच्या माध्यमातून पुन्हा मिळाल्याने, संसदेत लोकशाहीचा आवाज पुन्हा अधिक बुलंद होणार आहे!
शिवाय जनतेचा आवाज बंद करण्याचा प्रकार पुन्हा होऊ नये, म्हणून येत्या निवडणुकीत लोकांच्या माध्यमातून परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही!#RahulGandhi pic.twitter.com/W6bmbWXZSz
— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 7, 2023
दरम्यान, सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालानंतर राहुल गांधींना पुन्हा एकदा खासदारकी बहाल करण्यात आली आहे. लोकसभा सचिवालयाकडून या संबंधित एक अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
लोकसभा सचिवालयाने यासाठी सर्व कागदपत्रांची पडताळणी करून घेतली आहे. या प्रक्रियेनंतर गांधींना पुन्हा एकदा खासदारकी मिळाली आहे.
राहुल गांधी यांना पुन्हा एकदा खासदारकी मिळाल्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला आहे. कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयासमोर ढोल वाजवत एकमेकांना पेढे भरवत जल्लोष केला.
Rahul Gandhi will once again appear in the Parliament session
खासदारकी परत मिळाल्यानंतर राहुल गांधी पुन्हा एकदा संसदेच्या अधिवेशनामध्ये दिसून येणार आहे. गांधींनी आजपासूनच लोकसभेच्या कामकाजात भाग घेतला आहे.
तर उद्या लोकसभेच्या सभागृहात नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि राहुल गांधी आमने-सामने दिसणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- Eknath Shinde | “आधी वाघाची डरकाळी तर आता नागाची फुसफुस ऐकू…”; शिंदे गटाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
- Sanjay Shirsat | “सोनियाचा दिवस कधी येणार याची वाट…”; संजय शिरसाटांची उद्धव ठाकरेंवर टीका
- Ambadas Danve | “आमचा नेता आजही बलशाली…”; बावनकुळेंच्या टीकेला अंबादास दानवेंचं प्रत्युत्तर
- Ashish Shelar | उद्धव ठाकरेंची ओळख म्हणजे घरबशा मुख्यमंत्री – आशिष शेलार
- Vijay Wadettiwar | “हुकूमशाही सरकारविरोधी सुरू असलेल्या लढ्यातील…”; राहुल गांधींना खासदारकी मिळाल्यावर वडेट्टीवारांची प्रतिक्रिया