Share

Vijay Wadettiwar | “हुकूमशाही सरकारविरोधी सुरू असलेल्या लढ्यातील…”; राहुल गांधींना खासदारकी मिळाल्यावर वडेट्टीवारांची प्रतिक्रिया

🕒 1 min readVijay Wadettiwar | टीम महाराष्ट्र देशा: मोदी आडनाव प्रकरणावरून काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना गुजरात उच्च न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली होती. राहुल गांधी यांनी गुजरात उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेवर निकाल दिला आहे.Related News for Youशिवसेना कोणाची? अंतिम युक्तिवादासाठी दोन्ही … Read more

Published On: 

🕒 1 min read

Vijay Wadettiwar | टीम महाराष्ट्र देशा: मोदी आडनाव प्रकरणावरून काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना गुजरात उच्च न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली होती.

राहुल गांधी यांनी गुजरात उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेवर निकाल दिला आहे.

राहुल गांधी यांच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. कोर्टाच्या या निर्णयानंतर गांधींना पुन्हा एकदा खासदारकी बहाल करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केली आहे.

ट्विट करत विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले, “आज राहुल गांधी यांची खासदारकी पुन्हा त्यांना बहाल करण्याचा निर्णय सरकारला घ्यावा लागला. हुकुमशाही सरकारविरोधात सुरू असलेल्या संघर्ष लढ्यातील हा ऐतिहासिक क्षण आहे.

The voice of the people has become stronger again – Vijay Wadettiwar

देशातील जनतेचा निर्भिड आवाज बनून सरकारच्या जनविरोधी धोरणांचा विरोध करत राहुलजी हुकुमशाही सरकारला आव्हान देत आहेत.

खोट्या प्रकरणात शिक्षा देऊन राहुलजी गांधी यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांनी केला. परंतु हा जनतेचा आवाज पुन्हा अधिक मजबूत झाला आहे.

सर्वांच्या प्रगतीसाठी आणि चांगल्या भविष्यासाठी झटणाऱ्या प्रामाणिक नेत्याला देशवासीयांचा मिळत असलेला पाठिंबा हा अभूतपूर्व आहे.”

दरम्यान, सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानंतर राहुल गांधी यांना पुन्हा एकदा खासदारकी बहाल करण्यात आली आहे. लोकसभा सचिवालयाकडून यासंबंधीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

लोकसभा सचिवालयाने संबंधित सर्व कागदपत्रांची आज पडताळणी केली आहे. त्यानंतर गांधींच्या खासदारकीबद्दल एक अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यानंतर राहुल गांधी पुन्हा एकदा संसदेच्या अधिवेशनात दिसणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!