Rahul Gandhi | राहुल गांधींना खासदारकी बहाल, पुन्हा दिसणार संसदेच्या अधिवेशनात

Rahul Gandhi | नवी दिल्ली: काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मोदी आडनाव प्रकरणी गुजरात उच्च न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली होती. गुजरात उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या याचिकेवर निकाल दिला आहे. सुप्रीम कोर्टाने राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानंतर राहुल गांधींना पुन्हा खासदारकी बहाल करण्यात आली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर राहुल गांधी यांना पुन्हा एकदा खासदारकी बहाल करण्यात आली आहे. त्यामुळे राहुल गांधी आता पुन्हा एकदा संसदेच्या अधिवेशनात दिसणार आहे.

लोकसभा सचिवालयाकडून यासंबंधीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. लोकसभा सचिवालयाने सर्व कागदपत्रांची आज पडताळणी केली आहे. त्यानंतर त्यांनी राहुल गांधी यांच्या खासदारकीबद्दल अधिसूचना जारी केली आहे.

Rahul Gandhi has once again got MP

दरम्यान, राहुल गांधी यांना पुन्हा एकदा खासदारकी मिळाली आहे. यानंतर राहुल गांधी आजपासूनच लोकसभेच्या कामकाजात भाग घेणार आहे. तर उद्या नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि राहुल गांधी लोकसभेच्या सभागृहात आमने-सामने दिसणार आहे.

राहुल गांधी यांना पुन्हा एकदा खासदारकी मिळाल्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला आहे. कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयासमोर ढोल वाजवत एकमेकांना पेढे भरवत जल्लोष केला.

राहुल गांधी यांना खासदारकी मिळाल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अखेर विजय सत्याचा झाला असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.