🕒 1 min read
Jitendra Awhad | मुंबई: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) काल (06 ऑगस्ट) पुणे दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी त्यांची भेट घेतली असल्याची चर्चा रंगली आहे.
या भेटीनंतर जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील अजित पवार (Ajit Pawar) गटात सामील होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहे. या मुद्द्यावर जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
I and Jayant Patil will always be with Sharad Pawar – Jitendra Awhad
जयंत पाटील यांच्यासह तुम्ही देखील अजित पवार यांच्यासोबत जाणार असल्याचं बोललं जात आहे. या प्रश्नाचं उत्तर देत जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) म्हणाले, “मी आणि जयंत पाटील कायम शरद पवार यांच्यासोबत राहणार आहोत.
आमच्याबद्दल मुद्दाम अशा बातम्या पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. काही ब्लॉगर्स आहेत. ज्यांच्या माध्यमातून जयंत पाटील आणि माझ्या विषयी या सर्व अफवा पसरवल्या जात आहेत.
मात्र माझ्याबद्दल अशा चर्चा होणं हा माझ्यासाठी खूप मोठा अपमान आहे. मी आणि जयंत पाटील कायम शरद पवारांसोबत राहणार आहोत आणि हे मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो.
या प्रकरणावर जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी ट्विट करत देखील प्रतिक्रिया दिली आहे. ट्विट करत जितेंद्र आव्हाड म्हणाले, “राष्ट्रवादीचे प्रांताध्यक्ष श्री.जयंतजी पाटील साहेब यांच्याबद्दल संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न काही जणांकडून केला जात आहे.
जाणून बुजून ते कोणाला तरी भेटून आले,ते मंत्री होणार,त्यांनी गावातून लोक बोलावली,अशा प्रकारच्या बातम्या पेरण्यात येत आहेत. ही पेरणी कशासाठी केली जातेय, हे आम्हांला बरोबर समजतंय.
जयंत पाटील यांच्यासोबत माझं वैयक्तिक बोलण झालं. पण त्यांनी स्पष्टपणाने सांगितलं की,” जितेंद्र साहेबांनी ईशारा दिलेला आहे लढायचंय. आणि आता थांबणे नाही.”
मला वाटत नाही की,प्रत्येक नेत्याने दररोज येऊन सांगावं की,”आम्ही लढणार आहोत,आम्ही लढणार आहोत.” आम्ही मागेच सांगितल आहे की, “आम्ही पवार साहेबांच्या खांद्याला खांदा लावून लढणार आहोत.” त्या भूमिकेत काहीच फरक पडणार नाही.
तेव्हा कृपया ह्या अशा अफवांवर विश्वास ठेवू नका.आमचं ठरलंय,आम्ही लढणार म्हणजे लढणारच. लोकशाहीचं पवित्र मंदिर वाचवणे ही काळाची गरज आहे. आणि ते जर आम्ही केलं नाही तर, पुढची पिढी आम्हांला कधीच माफ करणार नाही.
सत्ता येते जाते, पण डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानातून निर्माण झालेली संसदीय लोकशाही वाचली नाही, तर पुढची पिढी आम्हांला कधीचं क्षमा करणार नाही.
राष्ट्रवादीचे प्रांताध्यक्ष श्री.जयंतजी पाटील साहेब यांच्याबद्दल संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न काही जणांकडून केला जात आहे.जाणून बुजून ते कोणाला तरी भेटून आले,ते मंत्री होणार,त्यांनी गावातून लोक बोलावली,अशा प्रकारच्या बातम्या पेरण्यात येत आहेत.ही पेरणी कशासाठी केली जातेय,हे… pic.twitter.com/1wVpMBG2LZ
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) August 6, 2023
महत्वाच्या बातम्या
- Chandrashekhar Bawankule | “ज्यांना वडिलांनी स्थापन केलेला पक्ष टिकवता…”; बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
- Kishori Pednekar | ठाकरे गटाला मोठा धक्का! कोविड घोटाळा प्रकरणी किशोरी पेडणेकरांवर गुन्हा दाखल
- Devendra Fadnavis | “कालपर्यंत सर्वोच्च न्यायालयाला शिव्या देणारे आज…”; देवेंद्र फडणवीसांची काँग्रेसवर टीका
- Sharad Pawar | भाजपला मोठा धक्का! कोल्हापुरातील बड्या नेत्याचा शरद पवार गटात प्रवेश
- Devendra Fadnavis | “आदित्य ठाकरेंनी डोळ्याला पट्टी बांधली म्हणून…”; देवेंद्र फडणवीसांची आदित्य ठाकरेंवर टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










