Chandrashekhar Bawankule | टीम महाराष्ट्र देशा: काल (06 ऑगस्ट) ठाकरे गट आणि संभाजी ब्रिगेडचा मेळावा पार पडला. या मेळाव्यामध्ये ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला होता.
देवेंद्रजींची (Devendra Fadnavis) आता आम्हाला दया येते. किती दिवस अजून ते दुसऱ्यांची ओझी वाहणार, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. त्यांच्या या टीकेला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
ट्विट करत चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले, “ज्यांना वडिलांनी स्थापन केलेला पक्ष टिकवता आला नाही ते उद्धव ठाकरे म्हणत आहेत की, भाजपमध्ये राम उरला नाही.
तुम्ही सत्तेसाठी हिंदुत्व गुंडाळून ठेवलं. आता प्रभू श्रीरामचंद्रांची तुम्हाला आठवण येत आहे.राम मंदिराचं भूमीपूजन झालं तेव्हा जल्लोष करणाऱ्या रामभक्तांवर तुमच्या सरकारनं राज्यभर गुन्हे दाखल केले होते हे तुम्ही विसरलात की काय?”
You don’t deserve to criticize Narendra Modi – Chandrashekhar Bawankule
पुढे ते (Chandrashekhar Bawankule) म्हणाले, “तुम्ही बाळासाहेबांची शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधून ठेवली होती. जी प्रामाणिक शिवसैनिकानं मुक्त केली आणि बाळासाहेबांचा भगवा झेंडा पुन्हा अभिमानाने महाराष्ट्रावर फडकला.
मा. नरेंद्र मोदीजींवर टीका करण्याची तुमची लायकी नाही हे अनेकदा तुम्हीच सिद्ध केले आहे आणि देवेंद्रजी मस्टर मंत्री नाही तर मास्टर आहेत. त्यांच्या मास्टरस्ट्रोकमुळेच तुम्हाला घरी बसावं लागलं.
ज्यांना वडिलांनी स्थापन केलेला पक्ष टिकवता आला नाही ते @uddhavthackeray म्हणत आहेत की, भाजपमध्ये राम उरला नाही. तुम्ही सत्तेसाठी हिंदुत्व गुंडाळून ठेवलं. आता प्रभू श्रीरामचंद्रांची तुम्हाला आठवण येत आहे.
राम मंदिराचं भूमीपूजन झालं तेव्हा जल्लोष करणाऱ्या रामभक्तांवर तुमच्या…
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) August 7, 2023
“औरंग्याच्या प्रवृत्तीसोबत कोण बसलं आहे. हे महाराष्ट्रातील जनतेनं पाहिलंय. औरंग्याच्या सत्तेला जसा छत्रपती शिवरायांनी सुरुंग लावला. तसाच सुरूंग जनतेनं तुमच्या सत्तेला लावला. 2024 सालीही जनता पुन्हा एकदा बाळासाहेबांच्या हिंदुत्ववादी विचारांच्या शिवसेनेला आणि भाजपला निवडून देईल.
तोवर तुम्ही औरंग्या, अफझल खान आणि इंग्रजांचा उदो उदो करत बसा कारण लोकांनी तुम्हाला सध्या तेवढंच काम दिलंय”. असही ते (Chandrashekhar Bawankule) या ट्विटमध्ये म्हणाले आहे.
महत्वाच्या बातम्या
- Kishori Pednekar | ठाकरे गटाला मोठा धक्का! कोविड घोटाळा प्रकरणी किशोरी पेडणेकरांवर गुन्हा दाखल
- Devendra Fadnavis | “कालपर्यंत सर्वोच्च न्यायालयाला शिव्या देणारे आज…”; देवेंद्र फडणवीसांची काँग्रेसवर टीका
- Sharad Pawar | भाजपला मोठा धक्का! कोल्हापुरातील बड्या नेत्याचा शरद पवार गटात प्रवेश
- Devendra Fadnavis | “आदित्य ठाकरेंनी डोळ्याला पट्टी बांधली म्हणून…”; देवेंद्र फडणवीसांची आदित्य ठाकरेंवर टीका
- Devendra Fadnavis | शिस्त आणि संवेदना मोडून चालणार नाही; देवेंद्र फडणवीसांचा नवनियुक्त पोलीस उपनिरीक्षकांना सल्ला