Devendra Fadnavis | शिस्त आणि संवेदना मोडून चालणार नाही; देवेंद्र फडणवीसांचा नवनियुक्त पोलीस उपनिरीक्षकांना सल्ला

Devendra Fadnavis | नाशिक: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिक दौऱ्यावर आहे. या दौऱ्यादरम्यान त्यांनी नाशिकच्या पोलीस प्रशिक्षक केंद्रात 122 व्या दीक्षांत सोहळ्यास उपस्थिती लावली.

या कार्यक्रमामध्ये बोलत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व नवनियुक्त पोलीस उपनिरीक्षकांचं मनापासून अभिनंदन केलं  आहे. त्याचबरोबर यावेळी बोलत असताना उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना मार्गदर्शन केलं आहे.

Discipline and sense should never be broken – Devendra Fadnavis

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, “आपल्या राज्यातील पोलीस दल हे भारतातील सर्वात मोठं आणि शिस्तबद्ध पोलीस दल आहे. या ठिकाणी दाखल होत असताना आम्हाला नेहमी जबाबदारीची जाणीव होते.

त्यामुळं या दलामध्ये असणाऱ्या प्रत्येकानं आपली शिस्त मोडू नये, याची काळजी घ्यायला हवी. त्याचबरोबर शिस्तीत संवेदना हरवून चालणार नाही.

शिस्त आणि संवेदना कधीच मोडायची नाही. कोणी कितीही मोठा असला तरी त्याच्या चुकीला माफी द्यायची नाही. प्रत्येकानं घेतलेली शपथ निभावण्याचा प्रयत्न करायचा आहे.

पुढे बोलताना ते (Devendra Fadnavis) म्हणाले, “आपल्याकडं येणारा प्रत्येक माणूस दुःखात आणि अडचणीत सापडलेला असतो. त्यावेळी आपल्यात संवेदना असणं अत्यंत गरजेचं आहे.

त्याचबरोबर आगामी काळामध्ये आपल्याला स्ट्रीट क्राईम सोबत सायबर क्राईमच्या आव्हानांना सामोरं जावं लागणार आहे. या आव्हानांचा सामना करण्यासाठी आपण सुसज्ज आहोत.

या सर्व आव्हानांना तुम्ही चांगल्या पद्धतीनं तोंड द्याल, अशी मी अशा व्यक्त करतो. समाजात गुणवत्तापूर्वक सुधारणा करण्यासाठी आणि समाजसेवा करण्यासाठी आपण काम करणार आहात.”

दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) काल संध्याकाळी नाशिकमध्ये दाखल झाले आहे. काल रात्री त्यांनी नाशिकच्या शासकीय विश्रामगृहामध्ये मुक्काम केला.

त्यानंतर त्यांनी आज सकाळी या दीक्षांत समारंभाला हजेरी लावली. त्यानंतर ते नागपूरसाठी रवाना झाले आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.