Sharad Pawar | मुंबई: काल (04 ऑगस्ट) राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संपलं आहे. अधिवेशन संपताचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाची आज दुपारी बैठक होणार आहे.
मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटर येथे शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडणार आहे. शरद पवार गटानं अधिवेशन संपताचं ही बैठक आयोजित केल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादीच्या चिन्ह आणि पक्षाच्या नावावर प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलं आहे. आगामी काळात पक्षाचं चिन्ह गेलं तर काय करायचं? पक्षाचं नवीन चिन्ह काय असेल?
याबाबत आजच्या बैठकीत चर्चा होणार असल्याचं बोललं जात आहे. त्याचबरोबर आगामी निवडणुकांसाठी राज्यात सभा आणि प्रचार कसा करायचा? याबाबत देखील या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती मिळाली आहे.
The meeting of Mahavikas Aghadi will be held today
दरम्यान, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी देखील तयारीला लागली आहे. शरद पवार (Sharad Pawar) गटाची ही बैठक होण्याआधी महाविकास आघाडीची बैठक पार पडणार आहे.
मुंबईतील नेहरू सेंटरमध्ये महाविकास आघाडीची ही बैठक आज दुपारी 12 वाजता आयोजित करण्यात आली आहे.
महाविकास आघाडीच्या या बैठकीमध्ये भाजपविरोधी लढ्याची ब्लू प्रिंट तयार केली जाणार असल्याचं बोललं जात आहे.
या बैठकीला शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह उद्धव ठाकरे, नाना पटोले, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, अनिल परब इत्यादी नेते उपस्थित राहतील. महाविकास आघाडी आणि शरद पवार गट या दोन्हींच्या बैठकीमध्ये काय चर्चा होईल? याकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- Uddhav Thackeray | “आत्याबाईंच्या मिश्यांप्रमाणे काहींची अवस्था झाली…”; ठाकरे गटाच्या निशाण्यावर कोण?
- Jitendra Awhad | आज मी वाढदिवसानिमित्त कुणालाही भेटणार नाही; जितेंद्र आव्हाड असं का म्हणाले?
- Sanjay Raut | “राहुल गांधींची खासदारकी ठरवून रद्द…”; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर संजय राऊतांची प्रतिक्रिया
- Narendra Modi | विरोधकांची आघाडी इंडिया नाही तर घमंडीया – नरेंद्र मोदी
- Vijay Wadettiwar | न्याय, सत्य आणि लोकशाहीचा दणदणीत विजय; सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया