Share

Vijay Wadettiwar | न्याय, सत्य आणि लोकशाहीचा दणदणीत विजय; सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया

Vijay Wadettiwar | टीम महाराष्ट्र देशा: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना मोदी आडनाव प्रकरणावरून गुजरात कोर्टानं दोन वर्षाची शिक्षा सुनावली होती. गुजरात उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी झाली आहे. राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती देण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे. याच … Read more

Published On: 

Vijay Wadettiwar | टीम महाराष्ट्र देशा: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना मोदी आडनाव प्रकरणावरून गुजरात कोर्टानं दोन वर्षाची शिक्षा सुनावली होती.

गुजरात उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी झाली आहे.

राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती देण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे. याच पार्श्वभूमीवर विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ट्विट केलं आहे. न्याय, सत्य आणि लोकशाहीचा दणदणीत विजय झाला असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

A resounding victory for justice, truth and democracy – Vijay Wadettiwar

ट्विट करत विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले, “न्याय, सत्य आणि लोकशाहीचा दणदणीत विजय. आमचे नेते राहुलजी गांधी यांना खोट्या खटल्यात सुनावलेल्या अन्यायकारक शिक्षेला आज देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.

उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती देण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा केवळ कायदेशीर दिलासा नाही तर आपल्या न्यायव्यवस्थेच्या सामर्थ्याचा, सामाजिक न्याय आणि एकात्मतेच्या आदर्शांप्रती असलेल्या अखंड बांधिलकीचा पुरावा आहे.

खासदारकी रद्द करण्याची शिक्षा झाल्यानंतर प्रतिकूल परिस्थितीत राहुलजी गांधी यांनी अतुट धैर्य दाखवले. सशक्त आणि सर्वसमावेशक भारतासाठी त्यांची दृष्टी केवळ वक्तृत्व नसून सकारात्मक बदलाची दिशा असल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे.”

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयानं शिक्षेला स्थगिती दिल्यानंतर राहुल गांधी यांना आपोआप लोकसभा सदस्यत्व बहाल झालं आहे. यासाठी फक्त राहुल गांधींना लोकसभा अध्यक्षांना एक अर्ज करावा लागेल.

यानंतर गांधी पुन्हा एकदा लोकसभेत दिसू शकतात. सध्या सुरू असलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात राहुल गांधींनी ही प्रक्रिया पूर्ण केली, तर त्यांना कामकाजात सहभागी होण्यास परवानगी मिळण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही