🕒 1 min read
Supriya Sule | टीम महाराष्ट्र देशा: काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयानं मोठा दिलासा दिला आहे. गुजरात न्यायालयानं मोदी आडनाव प्रकरणावरून राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली होती.
सर्वोच्च न्यायालयानं या शिक्षेला स्थगिती दिली आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानंतर राहुल गांधी यांचा खासदारकीचा मार्ग मोकळा झाला आहे. याच पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत राहुल गांधींचं अभिनंदन केलं आहे.
No one can suppress the voice of truth – Supriya Sule
ट्विट करत सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या, “सत्यमेव जयते! कोणीही सत्याचा आवाज दाबू शकत नाही. राहुल जी गांधी यांच्याबाबतीत माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय स्वागतार्ह आहे. राहुलजी गांधी तुमचे संसदेत स्वागत आहे.”
सत्यमेव जयते!
कोणीही सत्याचा आवाज दाबू शकत नाही. राहुल जी गांधी यांच्याबाबतीत माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय स्वागतार्ह आहे. राहुलजी गांधी तुमचे संसदेत स्वागत आहे.@RahulGandhi— Supriya Sule (@supriya_sule) August 4, 2023
दरम्यान, मोदी आडनाव प्रकरणावरून गुजरात न्यायालयानं राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली होती. गुजरात उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
या याचिकेवर आज सुनावणी झाली आहे. हा निर्णय देत असताना सर्वोच्च न्यायालयानं सत्र न्यायालयाला चांगलं सुनावलं आहे.
“राहुल गांधी यांनी केलेलं विधान आपत्तीकारक होतं. मात्र, कनिष्ठ न्यायालयानं त्यांना एवढी मोठी शिक्षा देण्याचं कारण अद्याप स्पष्ट केलेलं नाही. या प्रकरणावर गुजरात न्यायालयानं अजून विचार केलेला नाही.
ट्रायल कोर्टाला एवढी मोठी शिक्षा देण्याची काय गरज होती? त्याचबरोबर राहुल गांधींना एवढी मोठी शिक्षा देण्यात कारण कोर्टानं अद्याप दिलेलं नाही,” असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- Rahul Gandhi | आ रहा हूं, सवाल जारी रहेंगे; खासदारकी मिळाल्यानंतर राहुल गांधींचा मोदींना इशारा
- Raj Thackeray | तुमची ट्रिपल शक्ती कधी दिसणार? मनसेचा राज्य सरकारवर हल्लाबोल
- Rohit Pawar | साहेब सांगा न ही आमची फसवेगिरी कधी थांबायची? रोहित पवारांचं ‘ते’ ट्विट चर्चेत
- Devendra Fadnavis | औरंगजेब भारतीय मुस्लिमांचा हिरो होऊ शकत नाही – देवेंद्र फडणवीस
- Supriya Sule | “राज्याचे गृहखाते सक्षम नसल्याने…”; सुप्रिया सुळेंची गृहमंत्र्यांवर खोचक टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











