Raj Thackeray | तुमची ट्रिपल शक्ती कधी दिसणार? मनसेचा राज्य सरकारवर हल्लाबोल

Raj Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: मुंबईमध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आपल्या प्रलंबित मागण्यांबाबत आंदोलन सुरू आहे. बुधवारपासून या आंदोलनाला सुरुवात झाली आहे.

या आंदोलनाला सुरुवातीला तीन ते चार बस डेपोमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी पाठिंबा दिला होता. मात्र, आता आठ ते नऊ बस डेपोमधील कंत्राटी वाहक आणि चालक या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचे दिसून आले आहे.

याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं राज्य सरकारवर टीका केली आहे. सध्या राज्यामध्ये ट्रिपल इंजिन सरकार आहे. तुमची ट्रिपल शक्ती कधी दिसणार? असा सवाल मनसेनं उपस्थित केला आहे.

Is the Best Administration asleep?

मनसेनं (Raj Thackeray) ट्विट करत राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. ट्विट करत ते म्हणाले, “मुंबईतील बेस्ट प्रशासनाने काँट्रॅक्टर्सकडून लीजवर बसेस घेतल्या आहेत.

त्या काँट्रॅक्टर्सच्या बस चालकांनी संप पुकारला आहे. त्याचा आजचा तिसरा दिवस आहे. गेल्या दोन दिवसांत संपावर जाणाऱ्या चालकांची संख्या वाढत आहे. आणि ह्याचा फटका थेट मुंबईकरांना बसत आहे.

बेस्ट प्रशासन झोपलं आहे का? मुळातच ह्या काँट्रॅक्टर्सच्या बसेस रस्त्यात बंद पडणं, त्यांची देखभाल नीट नसणं ह्या तक्रारी होत्याच.

ह्या सगळ्यावर बेस्ट प्रशासनाने कधीच कारवाई केल्याचं दिसलं नाही. आणि आता तर थेट ह्या काँट्रॅक्टर्सच्या बस चालकांनी संप पुकारला आणि मुंबई वेठीला धरली गेली. आमचे काही प्रश्न

१) हा संप होणार आहे त्यावर आधीच कारवाई करावी आणि काही तयारी करावी असं बेस्ट प्रशासनाला वाटलं नाही?

२) काँट्रॅक्टर्स बेस्ट प्रशासनाला वेठीस धरू शकतात आणि त्यातून बेस्ट प्रशासनाची नाचक्की होत आहे ह्याच प्रशासनाला काहीच वाटत नाही का?

३) ह्या काँट्रॅक्टर्सना संप रोखण्यात अपयश आलं म्हणून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून, बेस्टला झालेल्या नुकसानीची भरपाई कधी आणि कशी करून घेणार?

४) राज्य सरकार ह्यावर नक्की काय पावलं उचलत आहे.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde), देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) आपणांस विनंती आहे की आता तर ट्रिपल इंजिन सरकार आहे, तुमची ट्रिपल शक्ती कधी दिसणार? मुंबईकर त्रस्त आहे.

दरम्यान, आझाद मैदानावर समाजसेविका प्रज्ञा खजूरकर यांनी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.

त्यांच्या या उपोषणाला घाटकोपर बस डेपोतील जवळपास 280 कंत्राटी कामगारांनी पाठिंबा दिला आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही, तोपर्यंत आम्ही मागे सरकणार नाही अशी भूमिका कंत्राटी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.