Rohit Pawar | टीम महाराष्ट्र देशा: सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात रोहित पवार यांनी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडले होते.
स्पर्धा परीक्षांच्या प्रवेश फीबद्दल रोहित पवार यांनी प्रश्न उपस्थित केला होता. याच पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी एक ट्विट केलं आहे.
रोहित पवार यांनी या ट्वीटच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा देणाऱ्या एका विद्यार्थ्याची व्यथा मांडली आहे. परमेश्वर मोरे या विद्यार्थ्यांनं ही कविता लिहिलेली आहे.
Parameshwar More has expressed his pain through poetry
परमेश्वर मोरे (Parameshwar More) या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनं आपली व्यथा एका कवितेच्या माध्यमातून मांडली आहे.
आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी त्याची ही कविता ट्विटरवर शेअर केली आहे. ट्विट करत रोहित पवार म्हणाले, “स्पर्धा परिक्षा देणाऱ्या परमेश्वर मोरे या विद्यार्थ्याने कवितेतून मांडलेली त्याची व्यथा सरकार आणि #MPSC पर्यंत पोचेल, अशी अपेक्षा आहे.. ही प्रातिनिधीक भावना सर्वच विद्यार्थ्यांची आहे, हे विसरता येणार नाही…
साहेब सांगा न, तुमच्या आशेवर
कुठंवर झुलायचं?
गण्याच्या बापानं सावकारकडं लाखभर कर्ज केलं, पोर साहेब होईल म्हणून बण्यानला सुद्धा ठिगळ दिलं..
यंदा पण परिक्षेत व्यवस्थेचा गोंदळ उडणार की काय?
साहेब सांगा न MPSC ची परिक्षा वेळेवर होईल काय?
उच्च अधिकारी होण्यासाठी आम्ही शहरात यायच..
छोट्याशा खोलीत पाच जणांनी कसं बसं राहायचं,
परिस्थिती अंगावर झेलत वेदनेवर मुक्त हसायचं..
अन तुमच्या तारीख प्रकरणामुळं आम्ही फसायचं
साहेब सांगा न तुमच्या आशेवर कुठंवर झुलायचं?
साहेब नोकरी नाही म्हणून आमचं प्रेम जेंव्हा दुसऱ्याच्या गळी बांधलं जात ना.. त्या प्रेमभंगाचं दु:ख काय असतं हे तुम्हाला माहिती नाही…
साहेब कारण तुमच्या दाराला बेरोजगारी कधी शिवत नाही…
साहेब MPSC देतो म्हणून आता लाज वाटते अभिमानानं सोईऱ्या धायऱ्यात, पाहुण्या-रावळ्यात, गावादिकात सांगायची.
साहेब सांगा कधी थांबेल MPSC रांगायची?
पोरगं अधिकारी झाल्यावर
आपल्या दु:खाचा फेरा सुटंल, असं स्वप्न बघणाऱ्या आमच्या आई-बापाला दु:खातून वर काढायच कसं? याच उत्तर हल्ली आम्हाला मिळत नाही.
कारण मातीला पडलेल्या भेगा नजरेला पडतात, पण कधी जागा सुटल्या नाहीत म्हणून काळजात झालेला भुकंप कोणालाच दिसत नाही…
साहेब सांगा न तुमच्या आशेवर कुठंवर झुलायचं?
साहेब… दर महिन्याला आमचा बाप जेंव्हा पैसे पाठवतो ना, तेंव्हा त्यांनी ते कसे मिळवले असतील हा विचार करून खरं सांगतो साहेब राञभर झोप येत नाही…
तरी पण एवढे सारे संकट डोक्यावर घेऊन आम्ही अभ्यास करायचा आणि तुम्ही मात्र काहीतरी कारण देऊन जागाच नाही काढायच्या…
साहेब सांगा न ही आमची फसवेगिरी कधी थांबायची?
साहेब सांगा न ही आमची फसवेगिरी कधी थांबायची?
स्पर्धा परिक्षा देणाऱ्या परमेश्वर मोरे या विद्यार्थ्याने कवितेतून मांडलेली त्याची व्यथा सरकार आणि #MPSC पर्यंत पोचेल, अशी अपेक्षा आहे.. ही प्रातिनिधीक भावना सर्वच विद्यार्थ्यांची आहे, हे विसरता येणार नाही…
👇साहेब सांगा न, तुमच्या आशेवर
कुठंवर झुलायचं?गण्याच्या बापानं…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 4, 2023
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis | औरंगजेब भारतीय मुस्लिमांचा हिरो होऊ शकत नाही – देवेंद्र फडणवीस
- Supriya Sule | “राज्याचे गृहखाते सक्षम नसल्याने…”; सुप्रिया सुळेंची गृहमंत्र्यांवर खोचक टीका
- Devendra Fadnavis | बेपत्ता मुली आणि महिलांचा शोध घेण्याच्या टक्केवारीत सुधारणा – देवेंद्र फडणवीस
- Ambadas Danve | राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यास हे सरकार अयशस्वी ठरलयं – अंबादास दानवे
- Mahesh Landge | भाजपकडून महेश लांडगेंना मोठा झटका! काही महिन्यातच काढून घेतली जबाबदारी