Mahesh Landge | भाजपकडून महेश लांडगेंना मोठा झटका! काही महिन्यातच काढून घेतली जबाबदारी

Mahesh Landge | पुणे: भाजप नेते गिरीश बापट यांचं निधन झाल्यामुळं पुणे लोकसभा मतदारसंघाची जागा रिकामी झाली होती. पुणे जिल्ह्यातील तीन लोकसभा मतदारसंघात समन्वयक भाजपकडून नेमण्यात आले आहे. यामध्ये भाजप नेते महेश लांडगे यांना पक्षाकडून मोठा धक्का मिळाला आहे.

भारतीय जनता पक्षानं मिशन 2024 ची मोर्चा बांधणी सुरू केली आहे. यासाठी त्यांनी लोकसभा मतदारसंघानुसार जबाबदारी निश्चित केली आहे.

पुणे लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांच्याकडं सोपवण्यात आली आहे. तर शरद पवार (Sharad Pawar) यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी राहुल कुल (Rahul Kul) यांच्याकडं  देण्यात आली आहे.

जून 2023 मध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी महेश लांडगे (Mahesh Landge) यांना देण्यात आली होती. मात्र, आता त्यांच्याकडून ती जबाबदारी काढून घेण्यात आली आहे. शिरूर मतदार संघाची जबाबदारी आता राजेश पांडे (Rajesh Pandey) यांना सोपवण्यात आली आहे.

Rajesh Pandey has joined BJP from Akhil Bharatiya Vidyarthi Parishad

दरम्यान, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमधून राजेश पांडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. राजेश पांडे हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष होते.

त्याचबरोबर शैक्षणिक क्षेत्रात देखील पांडे यांची मोठी कामगिरी आहे. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि पुणे विद्यापीठामध्ये त्यांनी प्राधिकरणावर काम केलं आहे. त्यामुळं भाजपनं त्यांच्यावर ही मोठी जबाबदारी सोपवली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमातून ‘मेरी माटी, मेरा देश’ अभियान राबवले होते. या अभियानाची जबाबदारी देखील राजेश पांडे यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

या अभियानाच्या संयोजक पदी राजेश पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राजेश पांडे या जबाबदाऱ्या कशा प्रकारे पार पडतील? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.