Ashish Shelar | लबाड लांडगा ढोंग करतोय; आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

Ashish Shelar | टीम महाराष्ट्र देशा: भाजप नेते आशिष शेलार यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर पुन्हा एकदा खोचक टीका केली आहे.

आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांना अनेक मुद्द्यांवरून चांगलंच सुनावलं आहे. लबाड लांडगा ढोंग करतोय, असं आशिष शेलार ट्विट करत म्हणाले आहे.

या ट्वीटमध्ये आशिष शेलार यांनी कुणाचंही नाव घेतलेले नाही. मात्र, आशिष शेलार यांनी ही टीका उद्धव ठाकरेंवर केली असल्याचं बोललं जात आहे.

ट्विट करत आशिष शेलार (Ashish Shelar) म्हणाले, “महाराष्ट्राची मागील अडीच वर्षे जी वाया गेली, त्या काळातील कवित्व महाराष्ट्र आजही विसरणार नाहीच…तरीही लक्षात असू द्या…

◆त्या काळात “ते” डॉक्टरांकडून नाही तर कंम्पाऊडरकडून औषधे घेत होते

◆कोव्हिडबाबत वैज्ञानिक नाही तर तत्कालीन मुख्यमंत्री तज्ज्ञ होते

◆मुंबईत चेरापुंजीपेक्षा जास्त पाऊस झाला तरी पाणी तुंबत नव्हते आणि हो.. सगळ्यात महत्त्वाचे जे काल व्हाईट पेपरवर उघड झाले, जे आम्ही सांगत होतोच..

◆वेदांता आणि फॉक्सकॉन सोबत कोणताही करार झालाच नव्हता…हा प्रकल्प महाराष्ट्रात आलाच नव्हता, तरीही “ते” ‘ प्रकल्प गेला..प्रकल्प गेला’असे गळे काढत होते. म्हणून यांचे एका वाक्यात वर्णन एवढेच!

●●लबाड लांडगा ढोंग करतोय!

Today is the last day of the Monsoon Session of the State Legislature

दरम्यान, सध्या सुरू असलेल्या राज्य विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. आजच्या दिवशी सभागृहात शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता (Ashish Shelar) आहे.

कारण सरकारनं अद्याप नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची मदत जाहीर केलेली नाही. त्यामुळं आज या मुद्द्यावरून विरोधक सत्ताधाऱ्यांना धारेवर धरू शकतात.

सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना अनेक मुद्द्यांवरून घेरलं (Ashish Shelar) होतं. यामध्ये समृद्धी महामार्गावर झालेले अपघात, महिलांचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, धार्मिक हिंसाचार इत्यादी मुद्द्यांवर चर्चा झाली. या मुद्द्यांवरून सभागृहात मोठा गदारोळ निर्माण झाल्याचं दिसून आलं होतं.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.