🕒 1 min read
Bhaskar Jadhav | मुंबई: आज विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांची विधानसभा विरोधी पक्षनेते पदी नियुक्ती झाली आहे. यानंतर विजय वडेट्टीवार यांना सर्वांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी देखील विजय वडेट्टीवार यांचं अभिनंदन केलं. यावेळी बोलत असताना भास्कर जाधव यांनी शिंदे गटावर टीका केली आहे. नियती न्याय केल्याशिवाय कुणालाही सोडत नाही, असं भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे.
भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) म्हणाले, “शिवसेना शिंदे गटाचे आमदार अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विरोधात बोलत होते. अजित पवार आम्हाला निधी देत नाही, असा गंभीर आरोप त्यांनी केला होता.
आमचं हिंदुत्व राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या मांडीवर नेऊन ठेवलं असल्याचं देखील ते म्हणत होते. मात्र, अजित पवार आता तुमच्या मांडीला मांडी लावून बसले आहे.
अजित दादा तुम्ही आता यांच्या मांडीवरून मानगुटीवर जाऊन बसा. तुम्हाला विजय वडेट्टीवार मदत करतील. तुम्ही आता त्यांच्या मानगुटीवर बसलं पाहिजे.”
Destiny does not leave anyone without justice – Bhaskar Jadhav
पुढे बोलताना ते (Bhaskar Jadhav) म्हणाले, “नियती न्याय केल्याशिवाय कुणालाही सोडत नाही. गुलाबराव पाटील तुमचं हिंदुत्व आता कुठं गेलं आहे?
शेवटी अजित पवार यांच्या हातात महाराष्ट्राच्या तिजोरीच्या चाव्या आहे. नियती नेहमी योग्य तो न्याय करत असते.”
यावेळी बोलत असताना भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी विजय वडेट्टीवार यांना सल्ला आणि शुभेच्छा दिल्या आहे. ते म्हणाले, “माझ्या घरामध्ये कुणाचाही राजकारणाशी काही संबंध नाही.
म्हणून मी निवडून आलो काय आणि पडलो काय? सरकारचं जिथं चांगलं काम आहे, तिथं त्यांचं तोंडभरून कौतुक करा. मात्र, जिथं सरकार चुकत असेल तिथे एकमेकांना डोळे मारू नका.
देवेंद्र फडणवीस तुम्हाला हळूच डोळा मारतील. मात्र, त्यानंतर तुम्ही तुमचा आवाज वर खाली करू नका. तुमच्या हातून चांगलं काम व्हावं यासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा.”
महत्वाच्या बातम्या
- Ajit Pawar | मला टोमणे मारायची सवय नाही; अजित पवारांची उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका
- Devendra Fadnavis | अजित पवार मुख्यमंत्री होणार? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
- Eknath Shinde | “नाना हमारे साथ है लेकीन…”; मुख्यमंत्री शिंदेंचं खळबळजनक विधान
- Vijay Wadettiwar | काँग्रेसच्या प्रस्तावाला विधानसभा अध्यक्षांची मान्यता! विजय वडेट्टीवार यांची विरोधी पक्षनेते पदी नियुक्ती
- Ajit Pawar | …अन् अजित पवार मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर विराजमान झाले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










