Share

Ajit Pawar | …अन् अजित पवार मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर विराजमान झाले

Ajit Pawar | मुंबई: अजित पवार सत्तेत सामील झाल्यापासून ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा सुरू आहे. त्याचबरोबर अजित पवारांनी देखील मुख्यमंत्री होण्याची इच्छा काही लपवून ठेवलेली नाही. याच पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकीय वर्तुळात एक मोठी घटना घडली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी अजित पवारांना मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसवलं आहे. आज मुंबईतील मनोरा आमदार … Read more

Published On: 

Ajit Pawar | मुंबई: अजित पवार सत्तेत सामील झाल्यापासून ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा सुरू आहे. त्याचबरोबर अजित पवारांनी देखील मुख्यमंत्री होण्याची इच्छा काही लपवून ठेवलेली नाही.

याच पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकीय वर्तुळात एक मोठी घटना घडली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी अजित पवारांना मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसवलं आहे.

आज मुंबईतील मनोरा आमदार निवासाच्या इमारतीचं भूमिपूजन झालं आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना आमंत्रित करण्यात आलं होतं.

मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या कार्यक्रमाला उपस्थित राहता आलं नाही. या कार्यक्रमाला आलेले बाकी मान्यवर आपापल्या खुर्च्यांवर विराजमान झाले होते.

अजित पवार राहुल नार्वेकर यांच्या शेजारी ठेवलेल्या मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीकडे गेले. त्यानंतर नार्वेकरांनी त्या खुर्चीवरील मुख्यमंत्र्याच्या नावाचं स्टिकर काढून ती खुर्ची अजित पवारांना बसण्यासाठी मोकळी करून दिली.

मुख्यमंत्री शिंदे यांच्या नावाचं स्टिकर काढल्यानंतर अजित पवार त्या खुर्चीवर बसले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Ajit Pawar will be Chief Minister till August 10 – Prithviraj Chavan

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्र्यांचा स्टिकर काढून ती खुर्ची अजित पवारांना (Ajit Pawar) बसण्यासाठी मोकळी करून दिल्यानं राज्याच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा नव्या चर्चा सुरू झाल्या आहे.

यापूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी अजित पवार 10 ऑगस्टपर्यंत मुख्यमंत्री होणार असल्याचा दावा करत राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली होती.

त्यानंतर याबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देखील वक्तव्य केलं होतं. या सर्व घटनांनंतर आज अजित पवार थेट मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर जाऊन बसले आहे.

राहुल नार्वेकर यांनी केलेल्या विनंतीमुळे अजित पवार त्या खुर्चीवर बसले आहे. या घटनेनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लावले जात आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही