Sambhaji Bhide | अमरावती: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर अमरावतीत भाजप आणि काँग्रेस आमने-सामने आल्याचं दिसून आलं आहे.
या पार्श्वभूमीवर भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी अमरावतीत पत्रकार परिषद घेत कॉँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांच्यावर आरोप केले होते.
त्यांच्या या आरोपांना काँग्रेस प्रवक्ते दिलीप एडतकर (Dilip Yedatkar) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपनं संभाजी भिडे नावाचा वळू सोडला असल्याचं दिलीप एडतकर यांनी म्हटलं आहे.
पत्रकारांशी संवाद साधत असताना दिलीप एडतकर म्हणाले, “मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे (Sambhaji Bhide) नावाचा वळू भाजपनं महाराष्ट्रामध्ये द्वेष पसरवण्यासाठी सोडला आहे.
भाजप खासदार अनिल बोंडे आणि शिवराय कुलकर्णी हे भाजप आणि संघाचे पाळीव नथुराम गोडसे आहे. त्या नथुराम गोडसेंनी महात्मा गांधींना मारलं होतं आणि हे गोडसे महात्मा गांधीजींच्या विचारांना मारण्याचा प्रयत्न करत आहे.”
BJP’s situation in Maharashtra is alarming – Dilip Yedatkar
पुढे बोलताना ते म्हणाले, “अमरावती जिल्ह्यामध्ये भाजपची परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. एकंदरीत भाजपची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये चिंताजनक आहे.
2024 मध्ये देशात भाजपचा सुपडा साफ होणार आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये भाजपला राजकीय पोळी शेकता यावी म्हणून ते या ठिकाणी दंगली घडवण्याचा प्रयत्न करत (Sambhaji Bhide) आहे.”
दरम्यान, संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं आहे. महात्मा गांधीजींचे खरे वडील एक मुस्लिम जमीनदार असल्याचं संभाजी भिडे यांनी म्हटलं आहे.
संभाजी भिडे यांच्या या वक्तव्यानंतर त्यांना अटक करण्याची मागणी करण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी भिडेंना नोटीस बजावली आहे. भिडे यांना अमरावती येथील राजापेठ पोलीस स्थानकात 08 दिवसात हजर राहण्याचे आदेश पोलिसांकडून देण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या
- Sharad Pawar | अखेर हा वृक्ष उन्मळून पडला; ना. धो. महानोर यांच्या निधनानंतर शरद पवार भावूक
- Uddhav Thackeray | “नावात समृद्धी असलेल्या महामार्गावर…”; ठाकरे गटाची राज्य सरकारवर खोचक टीका
- Sambhaji Bhide | संभाजी भिडेंना मोठा झटका! येत्या 08 दिवसात पोलिसांत हजर राहण्याचे आदेश
- Jitendra Awhad | जितेंद्र आव्हाडांनी संभाजी भिडेंच्या सुरक्षेबद्दल थेट सादर केला पुरावा; पाहा VIDEO
- Raj Thackeray | “नितीन कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाणारा…”; नितीन देसाईंच्या आत्महत्येनंतर राज ठाकरेंचं ट्विट