Share

Sharad Pawar | अखेर हा वृक्ष उन्मळून पडला; ना. धो. महानोर यांच्या निधनानंतर शरद पवार भावूक

Sharad Pawar | टीम महाराष्ट्र देशा: रानकवी ना. धो. महानोर यांनी वयाच्या 81 व्या वर्षी पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या निधनानंतर महाराष्ट्रानं मोठा साहित्यिक आणि कवी गमावला आहे. त्यांच्या निधनानंतर सर्वच क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर त्यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार देखील भावून झाले आहेत. शरद पवार … Read more

Published On: 

Sharad Pawar | टीम महाराष्ट्र देशा: रानकवी ना. धो. महानोर यांनी वयाच्या 81 व्या वर्षी पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या निधनानंतर महाराष्ट्रानं मोठा साहित्यिक आणि कवी गमावला आहे.

त्यांच्या निधनानंतर सर्वच क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर त्यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार देखील भावून झाले आहेत. शरद पवार यांनी ट्विट करत त्यांना आदरांजली अर्पण केली आहे.

ट्विट करत शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले, “माझे जवळचे मित्र आणि महाराष्ट्राचा रानकवी ना. धो. महानोर यांच्या निधनाने मला अतिशय दुःख झाले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील पळसखेड खेड्यात गरीब शेतकरी कुटूंबात जन्मलेल्या ना. धों. चे बालपण कष्टात गेले पण कष्ट झेलताना त्यांचे संवेदनशील मन रानात रमले.

तिथेच त्यांच्या सर्जनशीलतेला धुमारे फुटले. ना.धो. च्या कवितांनी रानातल्या कविता, पावसाळी कवितांनी , जैत रे जैत सारख्या अनेक चित्रपट गीतांनी मराठी माणसांच्या मनावर गारूड केले. ना. धों ची विधान परिषदेतील भाषणे देखील माणसाच्या काळजाचा ठाव घेत.”

पुढे ते (Sharad Pawar) म्हणाले, “ना. धो. खूपच हळवे , त्यात पत्नीच्या निधनाने ते आणखी खचले. मी , प्रतिभा त्यांच्या खचलेल्या मनाला उभारी देत राहिलो. पण अखेर हा वृक्ष उन्मळून पडला.

ना. धो. चे निधन देखील पावसाळ्याच्या दिवसांत व्हावा हा योग मनाला चटका लाऊन जाणारा आहे. मी आणि माझ्या कुटूंबांतर्फे या मृदू मनाच्या निसर्ग कवीला श्रद्धांजली अर्पण करतो.”

N D Mahanor will be cremated tomorrow at his native village

दरम्यान, प्रसिद्ध निसर्गकवी ना. धो. महानोर यांनी आज वयाच्या 81 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून ते किडनीच्या आजाराने त्रस्त होते.

त्यांची प्रकृती ढासळल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. पळसखेड या त्यांच्या मूळ गावी उद्या त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार (Sharad Pawar) आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही