🕒 1 min read
Uddhav Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: गेल्या काही दिवसांपासून समृद्धी महामार्गावरील अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. या अपघातांमध्ये अनेकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
याच पार्श्वभूमीवर आजच्या सामना अग्रलेखाच्या माध्यमातून ठाकरे गटानं राज्य सरकारला धारेवर धरलं आहे. नावात ‘समृद्धी’ असलेल्या महामार्गावरील अपघात आणि दुर्घटनांची मालिका थांबायला तयार नसल्याचं आजच्या सामना अग्रलेखात म्हटलं आहे.
समृद्धी महामार्ग हा सध्याच्या राज्यकर्त्यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ असेलही, पण तुमचे हे ‘स्वप्न’ निरपराध्यांसाठी ‘काळस्वप्न’ ठरत आहे, त्याचे काय?
राज्यकर्त्यांनी स्वप्न बघायचे आणि त्याची किंमत निरपराध्यांनी आपल्या ‘मृत्यू’ने चुकवायची, असेच समृद्धी महामार्गाबाबत सुरू आहे सोमवारच्या दुर्घटनेने हेच पुन्हा सिद्ध केले, असं आजचा सामना अग्रलेखात (Uddhav Thackeray) म्हटलं आहे.
Read Samana Editorial
‘समृद्धी’ महामार्ग हा सध्याच्या राज्यकर्त्यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ असेलही, पण तुमचे हे ‘स्वप्न’ निरपराध्यांसाठी ‘काळस्वप्न’ ठरत आहे, त्याचे काय? राज्यकर्त्यांनी स्वप्न बघायचे आणि त्याची किंमत निरपराध्यांनी आपल्या ‘मृत्यू’ने चुकवायची, असेच समृद्धी महामार्गाबाबत सुरू आहे सोमवारच्या दुर्घटनेने हेच पुन्हा सिद्ध केले.
राज्यकर्त्यांनी समृद्धीच्या महामार्गाचे स्वप्न जरूर पाहावे, पण निरपराध्यांचे रक्त आणि त्यांच्या कुटुंबीयांचे अश्रू यामुळे जर तुमचा हा महामार्ग सतत भिजत असेल तर त्याला ‘समृद्धी’ कशी म्हणणार?
अपघातग्रस्त समृद्धी महामार्गाने उपस्थित केलेला हा जळजळीत सवाल आहे. या महामार्गाचे कर्ते धर्ते हेच आज राज्याचे मुख्य आणि उपमुख्य आहेत… त्यांच्याकडे या प्रश्नाचे काय उत्तर आहे?
नावात ‘समृद्धी’ असलेल्या महामार्गावरील अपघात आणि दुर्घटनांची मालिका थांबायला तयार नाही ज्या समृद्धीच्या वल्गना या महामार्गाच्या निर्मात्यांनी केल्या ती समृद्धी कधी येणार, हे कोणीच सांगू शकत नाही, परंतु या महामार्गावरील अपघात, दुर्घटना आणि निरपराध्यांच्या बळींमध्ये मात्र दिवसेंदिवस ‘वृद्धींच होत आहे.
गेल्याच महिन्यात या महामार्गावर खासगी ट्रॅव्हल्स बसच्या भीषण अपघातात सुमारे 25 प्रवाशांचा जळून मृत्यू झाला होता. आता शहापूर तालुक्यातील सरलांबे येथे पुलाचे काम सुरू असताना सोमवारी मध्यरात्री भयंकर दुर्घटना घडली.
त्यात 20 कामगारांचा जागीच मृत्यू झाला. गर्डर मशीनला जोडणारी क्रेन आणि स्लॅब तब्बल शंभर फुटांवरून कामगारांवर कोसळला. आता या दुर्घटनेची चौकशी करण्याचा सोपस्कार राज्य सरकारने केला आहे.
नुकसान भरपाई जाहीर केली आहे. राज्यकर्त्यांनी दुख वगैरे व्यक्त केले, पण अशी वेळ समृद्धी महामार्गाबाबत वारंवार का येत आहे, याचा विचार तुम्ही कधी करणार आहात?
गेल्या फक्त सात महिन्यांत या महामार्गावरील अपघाती बळींची संख्या 107 एवढी झाली आहे. त्यात सोमवारच्या दुर्घटनेतील 20 दुर्दैवी मृत्यूची भर पडली. नागपूर ते मुंबई या महामार्गानि प्रवासाचा काळ कमी केला खरा, पण तोच अनेकांसाठी ते ‘काळ’ बनून त्यांचे जीव घेत आहे. या महामार्गाचा
‘अपघातांचा महामार्ग’
असा बदलौकीक होत आहे. नावात समृद्धी असलेल्या महामार्गाबाबत ही परिस्थिती ना सरकारसाठी भूषणावह आहे ना जनतेसाठी सुखावह, परंतु तरीही महामार्गाचे उर्वरित 200 किलोमीटर कामाचे घोडे पुढे दामटले जात आहे.
ज्या सरलाबे येथील पुलावर सोमवारची दुर्घटना घडली त्या पुलाच्या कामाबाबतही सरकारची हीच घिसाडघाई सुरू असल्याचा आरोप आहे. पुलाचे उरलेले 20 टक्के काम पुढील महिनाअखेर पूर्ण करण्याचे ‘टार्गेट’ कंत्राटदार कंपन्यांना दिले गेले आहे.
त्यामुळे रात्रंदिवस, पावसाळी वातावरणातही या पुलाचे काम सुरूच आहे. याच दबावाने आणि घिसाडघाईने 20 निरपराध कामगारांचा हकनाक बळी घेतला त्यांच्या कुटुबांना उघड्यावर पाडले गेल्या महिन्यात लक्झरी बसला झालेल्या अपघातावरून सरकारने संबंधित बस चालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला.
मग आता सोमवारच्या दुर्घटनेबाबत काय करणार आहात? कंत्राटदार कंपनी विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना बळीचा बकरा बनवणार आणि स्वतः पुन्हा मोकळे होणार! कालच्या दुर्घटनेचे नेमके कारण तपासात समोर येईल, पण या महामार्गावर आतापर्यंत झालेल्या छोटया मोठया अपघाताची, त्यातील
मृत्यूंची नैतिक जबाबदारी
सरकार म्हणून तुमचीही आहे की नाही? त्याचे काय प्रायश्चित्त तुम्ही घेणार आहात? की फक्त अपघात झाला, दुर्घटना झाली की, उसासे टाकायचे, मृत आणि त्यांच्या वारसांच्या नावाने ‘नक्राश्रू ढाळायचे, नुकसान भरपाईची तात्पुरती मलमपट्टी लावायची एवढेच करणार आहात?
समृद्धी महामार्गावरील आजवरच्या अपघातांमध्ये मरण पावलेल्यांच्या किंकाळया, त्याच्या नातलगांचा आक्रोश यामुळे ना सरकारच्या कानाचे पडदे फाटत आहेत ना हृदया पाझर फुटत आहे.
‘समृद्धी महामार्ग हा म्हणे सध्याच्या राज्यकर्त्यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ आहे असेलही, पण तुमचे हे ‘स्वप्न’ निरपराध्यांसाठी ‘काळस्वप्न ठरत आहे, त्याचे काय? पुन्हा समृद्धी येणार वगैरे ‘दिवास्वप्न’च आहेत राज्यकर्त्यांनी स्वप्न बघायचे आणि त्याची किंमत निरपराध्यांनी आपल्या ‘मृत्यू’ने चुकवायची, असेच समृद्धी महामार्गाबाबत सुरू आहे.
सोमवारच्या पूल दुर्घटनेने हेच पुन्हा सिद्ध केले. राज्यकर्त्यांनी समृद्धीच्या महामार्गाचे स्वप्न जरूर पाहावे, पण निरपराध्यांचे रक्त आणि त्यांच्या कुटुंबीयांचे अश्रू यामुळे जर तुमचा हा महामार्ग सतत भिजत असेल तर त्याला ‘समृद्धी’ कशी म्हणणार?
अपघातग्रस्त समृद्धी महामार्गानि उपस्थित केलेला हा जळजळीत सवाल आहे. या महामार्गाचे कर्ते धर्ते हेच आज राज्याचे मुख्य ‘आणि उपमुख्य आहेत. त्यांच्याकडे या प्रश्नाचे काय उत्तर आहे?
सौजन्य – सामना
महत्वाच्या बातम्या
- Sambhaji Bhide | संभाजी भिडेंना मोठा झटका! येत्या 08 दिवसात पोलिसांत हजर राहण्याचे आदेश
- Jitendra Awhad | जितेंद्र आव्हाडांनी संभाजी भिडेंच्या सुरक्षेबद्दल थेट सादर केला पुरावा; पाहा VIDEO
- Raj Thackeray | “नितीन कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाणारा…”; नितीन देसाईंच्या आत्महत्येनंतर राज ठाकरेंचं ट्विट
- Nitesh Rane | “महाराष्ट्रामध्ये काही दिवसांपासून हिरवे किडे…”; नितेश राणेंचं सूचक विधान
- Cabinet Expansion | ऑगस्ट महिन्यात राज्य मंत्रिमंडळ विस्तार होणार; शिंदे गटातील आमदारांना मिळणार संधी?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











