Share

Sambhaji Bhide | संभाजी भिडेंना मोठा झटका! येत्या 08 दिवसात पोलिसांत हजर राहण्याचे आदेश

Sambhaji Bhide | अमरावती: शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे संस्थापक आणि प्रमुख मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं आहे.

महात्मा गांधीजींचे खरे वडील करमचंद गांधी नसून एक मुस्लिम जमीनदार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला गेला होता.

त्याचबरोबर या विधानानंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं होतं. राज्य सरकार संभाजी भिडे यांना सुरक्षा देत असल्याचं विरोधकांनी म्हटलं होतं. अशात संभाजी भिडे यांच्याबद्दल महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

Police has issued a notice to Sambhaji Bhide

संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे. भिडे यांना अमरावती येथील राजापेठ पोलीस स्थानकात 8 दिवसात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे.

राज्यामध्ये भिडेंविरुद्ध ज्या ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहे, त्या ठिकाणचे गुन्हे अमरावतीत वर्ग करण्यात आले आहे. यानंतर भिडे पोलीस स्थानकात हजर राहणार का? याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. ते म्हणाले, “महात्मा गांधीजींचे वडील म्हणजेच करमचंद गांधी त्यावेळी एका मुस्लिम जमीनदाराकडे कामाला होते.

एक दिवस करमचंद गांधी त्या जमीनदाराची मोठी रक्कम घेऊन पळून गेले. त्यानंतर चिडलेल्या जमीनदाराने त्यांच्या पत्नीला म्हणजेच महात्मा गांधीजींच्या आईला आपल्या घरी पळवून आणले.

त्यानंतर त्या जमीनदाराने त्यांच्यासोबत पत्नीसारखा व्यवहार केला. म्हणून महात्मा गांधीजींचे खरे वडील करमचंद गांधी नसून ते मुस्लिम जमीनदार आहे.”

महत्वाच्या बातम्या

Sambhaji Bhide | अमरावती: शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे संस्थापक आणि प्रमुख मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रपिता महात्मा गांधी …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now