Devendra Fadnavis | “संभाजी भिडे हे हिंदुत्वासाठी काम…”; देवेंद्र फडणवीसांचं ‘ते’ विधान चर्चेत

Devendra Fadnavis | मुंबई: संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. महात्मा गांधींचे खरे वडील करमचंद गांधी नसून एक मुस्लिम जमीनदार असल्याचं संभाजी भिडे यांनी म्हटलं होतं.

यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या मुद्द्यावरून आज विधिमंडळात चांगलाच गदारोळ झाल्याचं दिसून आलं आहे. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात निवेदन दिलं आहे.

The police have sent a notice to Sambhaji Bhide – Devendra Fadnavis

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, “अमरावतीमध्ये भाषण सुरू असताना संभाजी भिडे यांनी आपल्या सहकार्याला एक पुस्तक वाचायला लावलं होतं. त्यावरून त्यांनी काही प्रतिक्रिया दिल्या आहेत.

या प्रकरणी अमरावती येथील राजापेठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी संभाजी भिडे यांना नोटीस पाठवली आहे. भिडेंनी देखील ती नोटीस स्वीकारली आहे. या प्रकरणाची चौकशी होईल.”

पुढे बोलताना ते (Devendra Fadnavis) म्हणाले, “संभाजी भिडे गुरुजी हे हिंदुत्वासाठी काम करतात. ते बहुजन समाजाला छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या इतिहासाशी जोडण्याचं काम करतात.

मात्र, तरीही त्यांना महापुरुषांबद्दल अशा प्रकारचं वक्तव्य करण्याचा अधिकार नाही. कुणी कोणत्याही राष्ट्रीय नेत्यासंदर्भात असं वादग्रस्त वक्तव्य केलं तर त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊन कारवाई होईल.”

दरम्यान, संभाजी भिडे यांच्या या वक्तव्यावर आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “महापुरुषांबद्दल अशा प्रकारचे वक्तव्य करणे योग्य नाही.

राहुल गांधींनी पुरावे देत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल भाष्य केलं होतं. परंतु संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल केलेलं विधान अत्यंत निंदनीय आहे. भिडे गुरुजी स्वातंत्र्याबद्दल संशय निर्माण करत आहे.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.