Share

Aditya Thackeray | “सत्तेत असलेले स्त्रियांबद्दल गलिच्छ बडबड…”; आदित्य ठाकरेंची राज्य सरकारवर खोचक टीका

Aditya Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: शिवसेना शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांच्यावर खोचक टीका केली होती. सौंदर्यामुळे प्रियंका चतुर्वेदी राजकारणात पुढे गेल्या असल्याचं संजय शिरसाट यांनी म्हटलं होतं. संजय शिरसाट यांच्या या वक्तव्यानंतर शिंदे गट आणि ठाकरे गट पुन्हा एकदा आमने-सामने आले होते. या … Read more

Published On: 

Aditya Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: शिवसेना शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांच्यावर खोचक टीका केली होती.

सौंदर्यामुळे प्रियंका चतुर्वेदी राजकारणात पुढे गेल्या असल्याचं संजय शिरसाट यांनी म्हटलं होतं. संजय शिरसाट यांच्या या वक्तव्यानंतर शिंदे गट आणि ठाकरे गट पुन्हा एकदा आमने-सामने आले होते. या प्रकरणावरून आता ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

Respecting women is the duty of every Indian – Aditya Thackeray 

ट्विट करत आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) म्हणाले, “स्त्रियांचा सन्मान राखणं हे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे. पण सध्या ह्याचा विसर अनेकांना पडला आहे.

भारतभरात स्त्रियांवर होणारे अत्याचार आणि हिंसक घटना दररोज वाढत आहेत. महाराष्ट्रात तर सत्तेत बसलेल्यांकडूनच स्त्रियांबद्दल वारंवार बेताल विधानं होत आहेत.

‘परस्त्री मातेसमान’ असे छत्रपती शिवरायांचे संस्कार असलेल्या महाराष्ट्रात आज ‘देखणेपणा’ अधोरेखित करत गलिच्छ बडबड केली जातेय.

“अश्यावेळी ठामपणे सांगायची गरज आहे, “नारी का अपमान, अब नहीं सहेगा हिंदुस्थान!” युवासेना युवती आणि शिवसेनेच्या वतीने आयोजित केलेल्या ह्या मूक मोर्चाला माझा संपूर्ण पाठिंबा आहे, सुजाण नागरिक म्हणून तुम्हीही पाठिंबा द्याल अशी आशा आहे!” असही त्यांनी (Aditya Thackeray) या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, संजय शिरसाट यांच्या टीकेला प्रियंका चतुर्वेदी यांनी प्रत्युत्तर दिलं होतं. त्या म्हणाल्या, “मी कोणत्याही चरित्रहीन व्यक्तींबद्दल बोलणार नाही. मला जे उत्तर द्यायचं होतं ते मी दिलं आहे. ही गद्दार लोक आहे. त्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारचं चारित्र्य नाही.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही