Rohit Pawar | “आता फक्त मुद्द्याचं…”; रोहित पवारांचा ‘तो’ टी-शर्ट चर्चेत

Rohit Pawar | मुंबई: राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सध्या सुरू असलेल्या विधिमंडळ पावसाळी अधिवेशनामध्ये त्यांच्या मतदारसंघातील एमआयडीसीचा मुद्दा उचलून धरला आहे.

यासाठी रोहित पवार यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन देखील केलं होतं. या प्रकरणावरून रोहित पवारांना त्यांच्या मित्रानं एक टी-शर्ट भेट दिला आहे.

आमदार रोहित पवार यांनी हा टी-शर्ट परिधान करून आज विधान भवनात प्रवेश केला आहे. या टी-शर्टवर असलेल्या मजकुरनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

रोहित पवार (Rohit Pawar) यांनी परिधान केलेला टी-शर्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. ‘ध्येय विकासाचं ठेवूया, वेध भविष्याचा घेऊया, युवाशक्तीला संधी देऊया आणि फक्त मुद्द्याचं बोलूया’ असा मजकूर या टी-शर्टवर लिहिलेला आहे. हा टी-शर्ट परिधान केल्यानंतर रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Let’s just talk to the point

ट्विट करत रोहित पवार म्हणाले, “माझ्या मतदारसंघातील MIDC सह सर्वच युवांसाठी महत्त्वाचा असलेला रोजगाराचा विषय अधिवेशनात लावून धरल्याने मतदारसंघाबाहेरच्या एका मित्राने हा टी-शर्ट भेट दिला. शिवाय

‘ध्येय विकासाचं ठेवूया
वेध भविष्याचा घेऊया
युवाशक्तीला संधी देऊया
आणि फक्त मुद्द्याचं बोलूया!

हा मनातला निश्चियही त्या टी-शर्टवर रेखाटत युवांच्या मुख्य प्रश्नांवरून ढळायचं नाही, हा मेसेज देण्याची त्याची कल्पना आवडल्याने आज हा टी-शर्ट घालूनच विधानभवनात प्रवेश केला.”

दरम्यान, कर्जत एमआयडीसीचा प्रश्न आता दिवसेंदिवस वाढतं चालला आहे. काल नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर होते. यावेळी मोदींच्या ताफ्यासमोर काही युवक कर्जत एमआयडीसी संदर्भातले पोस्टर घेऊन उभे होते. याबद्दल रोहित पवार (Rohit Pawar) यांनी ट्विट करत माहिती दिली होती.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.