Share

Rohit Pawar | “लोकार्पण की कौतुक सोहळा”?; पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमावर रोहित पवारांची बोचरी टीका

Rohit Pawar | अहमदनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल (दि. १९ जानेवारी) मुंबईतील विविध विकास कामांचे लोकार्पण आणि काही कामांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे देखील उपस्थित होते.

याच दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi) यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकमेकांवर स्तुतीसुमणं उधळली. यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी ट्विट करत टीका केली आहे. लोकार्पणाचा कार्यक्रम होता की एकमेकांचा कौतुक सोहळा होता हे कळेनासं झालंय, असं म्हणत रोहित पवारांनी नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमावर बोचरी टीका केली आहे.

काय म्हंटलंय ट्विटमध्ये?

ट्विटमध्ये त्यांनी म्हटले, “काल मुंबईतील कार्यक्रम पाहून हा प्रकल्पांच्या लोकार्पणाचा कार्यक्रम होता की एकमेकांचा कौतुक सोहळा होता हेच कळेनासं झालंय! मला तर वाटतं या कार्यक्रमातील भाषणं ऐकूण मिठी नदीही हसली असेल आणि खारा समुद्रही काही क्षण गोड झाला असेल!”

रोहित पवार यांनी यामध्ये नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचा मुद्दा पुन्हा उपस्थित करून भाजपवर निशाणा साधलाय. “मात्र, २०१६ साली छत्रपती शिवाजी महाराजांच्या समुद्रातील भव्य स्मारकाच्या भूमीपूजनासाठी आणलेल्या गड-किल्ल्यांवरील पवित्र मातीने नक्कीच मूक अश्रू ढाळले असतील, आणि अरबी समुद्रातील त्या खडकानेही आश्चर्याने कान टवकारले असतील!”, असा खोचक ट्विट रोहित पवार यांनी केलंय.

महत्वाच्या बातम्या :

Rohit Pawar | अहमदनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल (दि. १९ जानेवारी) मुंबईतील विविध विकास कामांचे लोकार्पण आणि …

पुढे वाचा

Ahmednagar Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now