Pankaja Munde | बीड : भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना ठाकरे गटाकडून शिवसेनेत येण्याची देण्यात आलेल्या ऑफरमुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या आहेत. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस ज्या कार्यक्रमांना उपस्थित राहतात, त्या कार्यक्रमांना पंकजा मुंडे नसतात, अशी कुजबुज सुरू झाली आहे. या संदर्भात पंकजा मुंडेंना विचारणा केली असता पंकजा मुंडे यांनी पहिल्यांदाच मौन सोडलं आहे.
शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजप नेत्या पंकजा मुंडे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) आणि खासदार प्रीतम मुंडे गेवराईत एकत्र आले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी मनात कोणतीही खदखद नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे पंकजा मुंडे ठाकरे गटात जाण्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्या कार्यक्रमात असतात त्या कार्यक्रमात पंकजा मुंडे दिसत नाहीत, अशी चर्चा आहे. त्यामागचं कारण काय?, असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर त्या म्हणाल्या, “माझ्या मनात कोणतीही खदखद नाही. त्यामुळे माझ्या मनात खदखद आहे अशा बातम्या लावण्याचं कारण नाही. फडणवीस ज्या कार्यक्रमाला आले, त्या कार्यक्रमात मी अपेक्षित नव्हते. त्यामुळे मी आले नाही. आज प्रदेशाध्यक्ष आले म्हणून मी आले. जे पी नड्डा जेव्हा आले, तेव्हाही मी आले.”
पुढे त्या म्हणाल्या, मी भाजपच्या संस्कारात वाढलेली सच्ची कार्यकर्ता आहे. त्यामुळे मी पक्षाचा प्रोटोकॉल पाळते. पण कोणत्याही सार्वजनिक आणि पक्षाबाहेरच्या कार्यक्रमाला जाणं मला बंधनकारक नाही.”
महत्वाच्या बातम्या :
- Makeup Remover | चेहऱ्यावरील मेकअप काढण्यासाठी हळदीचा ‘या’ करा प्रकारे वापर
- Weather Update | थंडीपासून मिळणार दिलासा, पाहा हवामान अंदाज
- Shivsena | “या निवडणुकीच्या निमित्ताने तांब्याचे पितळ होईल”; शिवसेनेची सत्यजीत तांबेंवर टीका
- Shivsena | “आमचे प्रबोधनकार म्हणायचे दारुची नशा जाते पण…”; शिवसेनेची सत्ताधाऱ्यांवर बोचरी टीका
- Narendra Modi | “मधल्या काळात डबल इंजिन सरकार नव्हतं म्हणून मुंबई, महाराष्ट्राचं नुकसान”- नरेंद्र मोदी