Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यासह देशामध्ये अनेक ठिकाणी थंडीची लाट (Cold Wave) पसरली आहे. उत्तर भारतामध्ये थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. या बदलत्या वातावरणाचा परिणाम थेट नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. थंडीपासून संरक्षण करण्यासाठी जागोजागी शेकोट्या पेटलेल्या दिसत आहे. अशात हवामान खात्याने नागरिकांना दिलासा देणारी बातमी दिली आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील पाच दिवस थंडीपासून दिलासा मिळणार आहे.
येत्या काही दिवसांमध्ये तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना थंडीपासून थोडा दिलासा मिळणार आहे. उत्तर भारतामध्ये येत्या पाच दिवसांमध्ये कमाल तापमान दोन ते चार अंश सेल्सिअसने वाढवण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, किमान तापमान दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढवण्याचा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. मात्र, येत्या 24 तासात वातावरणात कोणताही बदल दिसणार नाही. सध्या सक्रिय असलेल्या वेस्टर्न डिस्टर्बन्स पुढे सरकत आहे. त्यामुळे 23 ते 26 जानेवारी दरम्यान जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, कारगिलसह लडाखमधील रस्त्यांवर बर्फाची दादर पसरलेली दिसत आहे. त्यामुळे वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण झाला आहे. वाढत्या थंडीमुळे पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन देखील गोठल्या आहे. त्यामुळे येथील नागरिकांना आता विहिरीतून पाणी भरावे लागत आहे. या वाढत्या थंडीमुळे पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. लडाखमधील नदी-नाले पूर्णपणे गोठले आहे. त्याचबरोबर वाढत्या थंडीमुळे लडाख आणि कारगिलच्या बाजारपेठा रिकाम्या पडल्या आहेत.
अवकाळी पावसामुळे आधीच राज्यातील शेतकरी संकटात सापडला होता. आता पुन्हा एकदा वाढत्या थंडीमुळे शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांना धोका निर्माण झाला आहे. शेतीतील कापूस, हरभरा, तूर तसेच केळी या पिकांवर वाढत्या थंडीमुळे परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशात हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार राज्यातील शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- Shivsena | “या निवडणुकीच्या निमित्ताने तांब्याचे पितळ होईल”; शिवसेनेची सत्यजीत तांबेंवर टीका
- Shivsena | “आमचे प्रबोधनकार म्हणायचे दारुची नशा जाते पण…”; शिवसेनेची सत्ताधाऱ्यांवर बोचरी टीका
- Narendra Modi | “मधल्या काळात डबल इंजिन सरकार नव्हतं म्हणून मुंबई, महाराष्ट्राचं नुकसान”- नरेंद्र मोदी
- Narendra Modi | “मुंबई महापालिकेवर भाजपला सत्ता द्या”; पंतप्रधान मोदींचे आवाहन
- Devendra Fadanvis | “काही लोकांच्या बैईमानीमुळे डबल इंजिनचे सरकार पडले”; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा