Devendra Fadanvis | “काही लोकांच्या बैईमानीमुळे डबल इंजिनचे सरकार पडले”; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा 

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Devendra Fadanvis | मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल झाले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केल्यानंतर बिकेसी मैदानात सभा पार पडत आहे. सभेदरम्यान पहिल्यांदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी भाषण केले. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

ते म्हणाले, “पंतप्रधान मोदी सगळीकडंच लोकप्रिय आहेत जर तुनच्या लोकप्रियतेची स्पर्धा असते, तर मुंबईच पहिली आली असती. एवढे प्रेम मुंबईकरांचे आहे. 2019 मध्ये तुम्ही पाच वर्षांची डबल इंजिन सरकारने महाराष्ट्राला बदलेले आहे, असे तुम्ही म्हणाले होते. परंतु, तुमच्या शब्दांवर विश्वास ठेवून डबल इंजिन सरकार जनतेने आणली. परंतु, काहींनी बेईमानी केली. यामुळे अडीच वर्ष जनतेच्या मनातील सरकार बनू शकले नाही.”

दरम्यान, यावेळी बोलत असताना देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं तोंडभरून कौतुक केलं आहे. बाळासाहेबांचे सच्चे अनुनायी एकनाथ शिंदे यांनी हिंमत दाखवली आणि महाराष्ट्रात जनतेच्या मनातील सरकार आलं. महाराष्ट्र विकासाच्या दिशेने धावू लागली, असे फडणवीस यावेळी बोलताना म्हणाले.

“आज मेट्रोच्या ७ व २ लाईनच्या ३५ किलोमीटरचं उद्घाटन होत आहे. त्याचं भूमिपूजन मोदींनीच केलं होतं आणि आता उद्घाटनही तेच करत आहेत. ही नवी संस्कृती मोदींमुळे राज्यात आणि देशात निर्माण झाली आहे,” असंही फडणवीसांनी म्हंटल आहे.

महत्वाच्या बातम्या :