Parth Pawar | पार्थ पवार भाजपच्या वाटेवर? गोपीचंद पडळकर म्हणतात…

Parth Pawar | मुंबई : विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे सुपुत्र राष्ट्रवादीचे नेते पार्थ पवार (Parth Pawar) यांनी आज राज्याचे मंत्रीशंभुराज देसाई यांची भेट घेतली. पार्थ पवार आणि शंभुराज देसाई यांच्या भेटीवरुन पार्थ पवार हे राष्ट्रवादीमध्ये नाराज असल्याच्या चर्चेला जोर आला आहे. पार्थ पवार यांनी आज शंभुराज देसाई यांची त्यांच्या बंगल्यावर भेट घेतली. यावेळी विकासकामांवर चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. या भेटीवरुन भाजपचे आमदार गोपिचंद पडळकर (Gopichand Padlkar)यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नवीच चर्चा रंगली आहे.

“पार्थ पवार हे राष्ट्रवादीत अस्वस्थ आहेत. लोकसभेत त्यांचा पराभव झाला होता. या पराभवानंतर ते राजकीय स्थिरतेच्या शोधात आहेत. त्यामुळे त्यांनी मंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेतली असावी. रोहित पवार (Rohit Pawar) आमदार झाले. बारामतीमधील अॅग्रो त्यांच्याकडे आहे. तसेच रोहित पवार आता मुंबई क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष झाले. घरातून, आजोबांकडून अन्याय होत असेल म्हणून शंभुराज देसाईंची भेट घेतली असेल, पार्थ यांनाही राजकारणात स्थिर व्हायचं असेल, असेही पडळकर म्हणाले आहेत.

“हक्काच्या मतदारसंघात अडीच लाखांहून अधिक मतांनी लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला, याबाबतचे शल्य त्यांच्या मनात आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. आम्ही निवडणूक आली की कामाला लागत नाही. आमची तयारी अगोदरपासून सुरू आहे. त्यामुळे बारामतीसह यावेळी सर्व जागा जिंकू”, असा विश्वासही गोपिचंद पडळकरांनी व्यक्त केला आहे.

“लोकसभा निवडणुकांवेळी बारामतीची जागा थोडक्या मतांनी गेली होती, आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपा 48 जागा जिंकतील”, असा विश्वासही पडळकरांनी व्यक्त केला आहे.

महत्वाच्या बातम्या :

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.