Ashish Shelar | मुंबई : मुंबईत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा दौरा आहे. विविध कामाचे भूमिपूजन आणि विविध प्रकल्पांचे लोकार्पण यासाठी नरेंद्र मोदी मुंबईत येत आहेत. यावरून ठाकरे गटाने ‘आम्ही केलेल्या कामांचेच उद्घाटन करण्यासाठी नरेंद्र मोदी मुंबईत येत आहेत. आम्ही केलेल्या कामाचे श्रेयच हे सरकार घेत आहे’ अशी आरोपांची मालिका सुरु केली आहे. या सगळ्याला आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी आता ट्विट करून उत्तर दिले आहे.
“उद्धव ठाकरेंच्या काळात घरभरणी झाली, तर शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात विकासाची पायाभरणी होत आहे. याकूबची कबर सजवणे, मनसुख हिरेनची हत्या, दाऊदच्या मालमत्तांची खरेदी, बदल्यांमध्ये वसुली, सचिन वाझे, नालेसफाईत भ्रष्टाचार, कोविडमध्ये नातेवाईकांची भलामण, मेट्रो कारशेड रखडवणे ही तुमच्या काळातली विकासकामं आहेत. या सगळ्याचं श्रेय हे निर्विवाद उद्धव ठाकरेंचेच आहे”, असे आशिष शेलार म्हणाले आहेत.
उद्धव ठाकरेंच्या काळात घरभरणी झाली, तर शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात विकासाची पायाभरणी होत आहे.@BJP4Mumbai @BJP4Maharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis @CMOMaharashtra pic.twitter.com/nRWUrbNXC7
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) January 19, 2023
दरम्यान, आज पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते भूमीपूजन आणि लोकार्पण होतं आहे ही सगळी मुंबईकरांची स्वप्नपूर्ती आहे. त्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तुमचा काय संबंध? असलाच तर विरोध करण्याएवढाच. म्हणून आज मुंबईकरांच्या स्वप्नपूर्तीच्या आनंदाच्या क्षणात विरजण घालताय, असा गंभीर आरोपही आशिष शेलारांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- Nana Patole | “एखाद्या गटाराचं उद्घाटन मोदींच्या हस्ते करावं, हे…”; नाना पटोले नेमकं काय म्हणाले?
- Supriya Sule | “मला त्यांची काळजी वाटते, ते ग्रामपंचायत निवडणूक असली तरी…”; सुप्रिया सुळेंचा मोदींना खोचक टोला
- Rakhi Sawant | …म्हणून राखी सावंतला केलं अटक; थोड्याच वेळात करणार कोर्टात हजर
- Shivsena | “मगरीने बेडूक गिळावा असे मिंधे सराकर…”; शिवसेनेची भाजपवर आगपाखड
- Parth Pawar | अजित पवारांचे सुपुत्र राष्ट्रवादीत नाराज?; घेतली शंभुराज देसाईंची भेट, पडळकर म्हणतात…
- Arvind Sawant | लोकार्पण सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवरून अरविंद सावंत म्हणाले, “माननीय तर सोडा, माझ्या नावापुढे…”