Share

Parth Pawar | अजित पवारांचे सुपुत्र राष्ट्रवादीत नाराज?; घेतली शंभुराज देसाईंची भेट, पडळकर म्हणतात…

Parth Pawar | कोल्हापूर : विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे सुपुत्र राष्ट्रवादीचे नेते पार्थ पवार यांनी आज राज्याचे मंत्री शंभुराज देसाई यांची भेट घेतली. पार्थ पवार यांनी अचानक शंभुराज देसाई यांची भेट घेतल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. पार्थ पवार आणि शंभुराज देसाई यांच्या भेटीवरुन पार्थ पवार हे राष्ट्रवादीमध्ये नाराज असल्याच्या चर्चेला जोर आला आहे.

पार्थ पवार यांनी आज शंभुराज देसाई यांची त्यांच्या बंगल्यावर भेट घेतली. यावेळी विकासकामांवर चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. या भेटीबाबत पार्थ पवार यांनी काहीही भाष्य केले नाही. त्यातच भाजपचे आमदार गोपिचंद पडळकर यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नवीच चर्चा रंगली आहे. गोपिचंद पडळकर यांनी अत्यंत सूचक वक्तव्य केले आहे.

“पार्थ पवार अस्वस्थ आहेत. त्यामुळे त्यांनी शंभूराजे देसाई यांची भेट घेतली असावी. रोहित पवार आमदार झाले. बारामती अॅग्रो त्यांच्याकडे आहे. मुंबई क्रिकेट बोर्डाचे अध्यक्षही झाले. आजोबांकडून अन्याय होत असल्याची भावना पार्थची असेल. हक्काच्या मतदारसंघात अडीच लाखाहून अधिक मतांनी पराभूत झालाचे शल्य त्यांच्या मनात आहे. त्यामुळेच ही भेट झाली असावी”, असे गोपिचंद पडळकर म्हणाले.

दरम्यान, “पार्थ पवार यांनाही राजकारणात स्थिर व्हायचे असेल. पण भेट का घेतली? काय चर्चा झाली हे मला माहीत नाही”, अशी सारवासारव देखील गोपिचंद पडळकरांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या 

Parth Pawar | कोल्हापूर : विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे सुपुत्र राष्ट्रवादीचे नेते पार्थ पवार यांनी आज राज्याचे मंत्री शंभुराज …

पुढे वाचा

Maharashtra Kolhapur Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now