Share

Chhota Rajan | छोटा राजनचा भाऊ सर्वच निवडणुका लढवणार?; आरपीआयच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड

Chhota Rajan | मुंबई : राज्यातील 10 महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम कधीही जाहीर होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच राजकीय पक्ष निवडणुकांची तयारी करताना दिसत आहेत. राष्ट्रीय पक्षापासून ते आरपीआयच्या छोट्या गटांपर्यंत सर्वच जण निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए)च्या राष्ट्रीय अध्यक्षपदी गँगस्टर छोटा राजनचा भाऊ दीपक निकाळजे यांची फेरनिवड करण्यात आली आहे. आरपीआयएच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

चेबूर येथे बुधवारी रात्री रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए)ची एक परिषद पार पडली. यावेळी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी पुन्हा छोटा राजनचा भाऊ दिपक निकाळजे यांची निवड करण्यात आली. या परिषदेत देशभरातील 30 राज्यांमधून आरपीआयचे नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर दीपक निकाळजे यांनी रिपब्लिकन ऐक्याची हाक दिल्याचे पाहायला मिळत आहे.

“आमच्या पक्षाचे हे दहावे राष्ट्रीय अधिवेशन आहे. मी अध्यक्ष झाल्यानंतरचं हे पहिलं राष्ट्रीय अधिवेशन आहे. माझी बिनविरोध राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली. महापालिका निवडणुकीसाठी आमच्या पक्षाची तयारी सुरू आहे. आमचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्याचं आमचं टार्गेट आहे”, असे दीपक निकाळजे यांनी सांगितले आहे.

दरम्यान, “आंबेडकरी विचारांच्या सर्वच नेत्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या बॅनरखाली एकत्र येऊन काम करावं” अशी भूमिका दीपक निकाळजे यांनी मांडली आहे.

महत्वाच्या बातम्या 

Chhota Rajan | मुंबई : राज्यातील 10 महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम कधीही जाहीर होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच राजकीय पक्ष …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now