Ambadas Danve । मुंबई : राज्यातील राजकीय वातावरण सध्या चांगलंच तापलेलं आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. अशातच शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे. या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे नेते आणि विधानपरिषद विरोधीपक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी राहुल शेवाळेंवर निशाणा साधला आहे.
जेपी नड्डा यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी फेरनिवड झाल्याबद्दल राहुल शेवाळे यांनी भेट घेत त्यांचं अभिनंदन केलं. याशिवाय, आगामी काळात होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरीही दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर येतेय. धनुष्यबाणावर निवडून येऊन भाजपाच्या मंडळींचे उंबरे झिजवत असल्याची बोचरी टीका अंबादास दानवे यांनी राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांच्यावर केली आहे.
वा @shewale_rahul जी, निवडून आलात धनुष्यबाणावर आणि उंबरे झिजवता भाजपाई मंडळींचे? कितीही उंबरे झिजवा, यंदा तुम्हाला तुमच्याच मतदारसंघात आम्ही तुम्हाला चितपट करू. गाठ खऱ्या शिवसेनेशी, शिवसैनिकांशी आहे, ध्यानी असू द्या! https://t.co/TJgdfLZRcL
— Ambadas Danve (@iambadasdanve) January 18, 2023
“वा राहुल शेवाळेजी, निवडून आलात धनुष्यबाणावर आणि उंबरे झिजवता भाजपाई मंडळींचे? कितीही उंबरे झिजवा, यंदा तुम्हाला तुमच्याच मतदारसंघात आम्ही चितपट करू. गाठ खऱ्या शिवसेनेशी, शिवसैनिकांशी आहे, ध्यानी असू द्या!” असा अंबादास दानवे यांनी ट्वीटद्वारे राहुल शेवाळेंना इशारा दिला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- संतुलित आहारात भरड धान्याची गरज
- Health Tips | दररोज सकाळी पाण्यात उकळून प्या बडीशेप, मिळतील ‘हे’ जबरदस्त फायदे
- Urfi Javed | उर्फीचा कहर! कपड्यांवरून वाद सुरू असताना केला टॉपलेस व्हिडिओ शेअर
- Amruta Fadanvis | “उपमुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात आज रिल व्हिडिओ…” ; अमृता फडणवीस यांची ‘ती’ क्लिप वादात
- Weather Update | राज्यात थंडीचा कडाका कायम, तर ‘या’ भागांत पाऊसाची शक्यता