Urfi Javed | उर्फीचा कहर! कपड्यांवरून वाद सुरू असताना केला टॉपलेस व्हिडिओ शेअर

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Urfi Javed | मुंबई: इंटरनेट सेन्सेशनमुळे उर्फी जावेद (Urfi Javed) नेहमी तिच्या विचित्र फॅशनमुळे चर्चेत असते. भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी उर्फीच्या विचित्र कपड्यांवर पोलीस तक्रार दाखल केली होती. त्यानंतर उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यातील वाद चांगलाच पेटला होता. दोघीही एकमेकींवर आरोप प्रत्यारोप करत होत्या. त्यांचा हा वाद राज्य महिला आयोगापर्यंत पोहोचला होता. अशात उर्फीने पुन्हा एकदा सोशल मीडियावर एक बोल्ड व्हिडिओ शेअर केला आहे.

उर्फीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये ती टॉपलेस अवतारामध्ये दिसली आहे. उर्फीची टॉपलेस होण्याची ही पहिली वेळ नाही. तिने या आधी देखील असे व्हिडिओ शेअर केले आहे. मात्र, तिच्या कपड्यांवरून वाद सुरू असताना तिने हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामुळे नेटकऱ्यांचा पारा चांगलाच चढला आहे.

उर्फीने या व्हिडिओमध्ये आपले शरीर झाकण्यासाठी केसांचा आधार घेतला आहे. तिने यावेळी चक्क वेणीने आपले शरीर झाकले आहे. उर्फीचा हा बोल्ड व्हिडिओ पाहून नेटकरी हैराण झाले आहे. तिच्या या व्हिडिओवरून पुन्हा एकदा ती ट्रोल झाली आहे. उर्फीच्या या व्हिडिओनंतर चित्रा वाघ आणि तिच्यामध्ये सुरू असलेला वाद आता कुठे वळण घेईल? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

चित्रा वाघ यांनी केलेल्या तक्रारीनंतर उर्फी त्यांना सतत डिवचत आहे. उर्फी ट्विट करत चित्रा वाघ यांना म्हणाली, “उर्फी की अंडरवेअर मे, छेद हे चित्रा ताई ग्रेट है.” इतकंच नव्हे तर तिने या कॅप्शन शेजारी तीन रेड हार्ट इमोजी देखील पोस्ट केले होते. यापूर्वी तिने पोस्ट करत चित्रा वाघ यांना सासू म्हटले आहे. ती ट्विट करत म्हणाली होती, “मेरी डीपी इतनी धांसू, चित्रा मेरी सासू.”

महत्वाच्या बातम्या