Brijbhushan Singh | बृजभूषण सिंह यांच्या अडचणीत वाढ; महिला पैलवानांच्या लैंगिक शोषणाचे आरोप

Brijbhushan Singh | नवी दिल्ली : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करुन महाराष्ट्रात प्रसिद्ध झालेले भाजपचे खासदार आणि रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह (Brijbhushan Singh) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. दिल्लीमध्ये स्थित जंतर-मंतरवर भारतीय कुस्ती फेडरेशन विरुद्ध विनेश फोगाट, बजरंग पूनिया, साक्षी मलिक आणि अन्य कुस्तीपटू हे आंदोलनाला बसले आहेत.

बुधवारी 18 (जानेवारी) या कुस्तीपटूंनी बृजभूषण सिंह यांच्यावर हुकूमशाहीचे आरोप लावत बृजभूषण सिंह याला पदावरुन दूर करण्याी मागणी केली जात आहे. टोकियो ऑलम्पिकमध्ये पदक जिंकणारा बजरंग पुनिया आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप पदक विजेती विनेश फोगाट यांच्यासह देशातील अनेक मल्ल आज दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलनास बसले आहेत.

विनेश फोगाट हिने भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्यावर महिला खेळाडूंचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप लावला आहे. “प्रशिक्षकही महिला खेळाडूंचे शोषण करतात. त्यामुळे आम्ही याच्याविरोधात आवाज उचलण्याचा निर्णय घेतला आहे. ही लढाई आम्ही शेवटपर्यंत लढू आणि बृजभूषण सिंह यांना पदावरुन दूर करेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही”, असा इशारा आंदोलकांच्यावतीने देण्यात आला आहे.

प्रशिक्षक महिला खेळांडूसोबत अन्याय करत आहेत. कुस्ती महासंघाचे काही जवळचे प्रशिक्षक महिला खेळाडूंचे लैंगिक शोषण करतात. एवढंच नाही तर बृजभूषण सिंह यांनी देखील मुलींचे लैंगिक शोषण केले आहे.

“कुस्ती महासंघ आमच्या वैयक्तिक जीवनात हस्तक्षेप करतो. आम्हाला छळण्याचा प्रयत्न केला जातो. आमचे शोषण केले जात आहे. आम्ही जेव्हा ऑलिम्पिकसाठी बाहेर गेलो तेव्हा आम्हाला फिजियो कोच दिला गेला नाही. जेव्हा आम्ही याविरोधात आवाज उचलतो, तेव्हा आम्हाला धमकी देवून शांत केले जाते”, असेही विनेश फोगाट म्हणाली आहे.

महत्वाच्या बातम्या :

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.