Congress | कोल्हापूरात काँग्रेसला मोठा झटका; ‘या’ बड्या नेत्याने दिली पक्षाला सोडचिठ्ठी

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Congress | कोल्हापूर : सध्या विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवरुन महाराष्ट्रातील राजकारण तापलेलं आहे. काँग्रेस मोठ्या संकटात असतानाच आता कोल्हापुरातून (Kolhapur) काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उमेश आपटे (Umesh Apte) यांनी आपल्या पक्षाला रामराम ठोकला आहे. त्यामुळे कोल्हापूर काँग्रेसमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

कोल्हापुरातील काँग्रेसचे मोठे नेते अशी ख्याती असलेले आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांच्यासाठी हा सर्वात मोठा झटका मानला जात आहे. उमेश आपटे यांची सतेज पाटील यांचे कट्टर समर्थक अशी ओळख आहे. असे असताना त्यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकल्याने दिल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहे.

उमेश आपटे यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. आपटे यांच्या राजीनाम्यामुळे आमदार सतेज पाटील आणि काँग्रेसला हा मोठा धक्का बसला असून कोल्हापूरात काँग्रेसचे मोठे नुकसान होणार असल्याचे दिसून येत आहे.

उमेश आपटे यांनी काँग्रेस पक्षाला रामराम केल्यामुळे आता महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते काय भूमिका घेतात, उमेश आपटे यांची मनधरणी केली जाईल का? हे पाहणं महत्त्वाचं आहे. उमेश आपटे हे भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती मिळत आहे.

महत्वाच्या बातम्या :