Ashish Shelar | “उगाच बसून जीभ नाकाला लावण्याचे धंदे ठाकरेंच्या शिवसेनेने करू नये”; शेलारांचा पलटवार

Ashish Shelar | मुंबई :  शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना, ‘कोरोनाकाळात डॉक्टर आणि परिचारिकांनी पळ काढला होता’, असे वादग्रस्त वक्तव्य केले. या पार्श्वभूमीवर इंडियन मेडिकल असोसिएशनने संताप व्यक्त केला आणि आंदोलनाचा इशाराही दिला आहे. संजय राऊतांच्या वक्तव्यावरून भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली आहे.

राज्यातून जे प्रकल्प परराज्यात गेले त्यावरून ‘मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी अगोदर हे प्रकल्प महाराष्ट्रात आणण्यासाठी पंतप्रधानांकडे मागणी करावी आणि मग दावोसला जावे’, असे शिवसेनेने म्हटले होते. यावरुनही आशिष शेलारांनी शिवसेनेवर चांगलाच पलटवार केला आहे.

“खाई त्याला खवखव. उगाच बसून जीभ नाकाला लावण्याचे धंदे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने करू नये. स्वत: काही केले नाही, स्वत:ला काही करता आले नाही. दोवोसमध्ये जाऊन एक लाख कोटींच्या वर सामंजस्य करार मुख्यमंत्री करत आहेत. या ठिकाणी लाखो मुंबईकर स्वत:चं स्वप्नपूर्ती होते आहे, त्यात संमेलीत होत आहेत. मग यामध्ये ‘मी कुठे’ हे दाखवण्याचा त्यांचा वायफळ प्रयत्न आहे. म्हणून माझा सल्ला आहे, जीभ नाकाला लावायचा प्रयत्न करू नका”, असा खोचक सल्ला आशिष शेलार यांनी दिला आहे.

“या महाराष्ट्रात बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्याचे नाव म्हणजे संजय राऊत आहे. बेतालपणे बोलायचे अगदी पातळी सोडून बोलायचे. असंबंध बोलायचे. दुर्दैवं आहे की अशा पद्धतीने ज्या डॉक्टारांनी, परिचारिकांनी, पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांनी आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी करोना काळात खऱ्या अर्थाने स्वत:चा जीव धोक्यात घालून, राज्याची आणि जनतेची सेवा केली, त्यांच्याबद्दल अपमानास्पद बोलायचे. यांनी अहंकाराचा परमोच्च बिंदू गाठला आहे, म्हणून जनता यांना सोडणार नाही. जर डॉक्टर्स आंदोलन करणार असतील तर त्यांना आमचे समर्थन आहे आणि त्यांच्या आंदोलनातील मागण्याही चुकीच्या नाहीत. खरंतर संजय राऊतांनी माफी मागितलीच पाहिजे”, असे आशिष शेलार म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या