Ambadas Danve | “मनसेचा एक आमदार गेल्याने चिन्ह गेले का?”; अंबादास दानवेंचा सवाल

Ambadas Danve | मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिंदे गटातच दोन गट पडले. सहा महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ४० आमदारांसह बंड पुकारलं आणि भाजपसोबत युती करत राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन केलं. तेव्हापासून हे सरकार बेकायदेशीर असल्याचा दावा विरोधकांकडून केला जाऊ लागला. परिणामी ‘खरी शिवसेना नेमकी कुणाची?’ या वादाला सुरुवात झाली.

शिवसेना आणि धनुष्यबाण कुणाकडे जाणार याचा निर्णय काल देखील लागला नाही. केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये सुरू असलेली ही सुनावणी आता शुक्रवारी, 20 जानेवारीला होणार आहे. या पार्श्वभूमीवर विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी प्रतिक्रिया देताना शिंदे गटावर निशाणा साधला. यावेळी त्यांनी मनसेचं उदाहरण देत सवाल उपस्थित केला.

“मनसेचा एक आमदार गेल्याने मनसेचे चिन्ह गेले का”, असा सवाल त्यांनी विचारला आहे. खासदार, आमदार असणे हा एक संघटनेचा भाग आहे. पण, पूर्ण संघटना नाही. शिवसेनेची ही संघटना गावपातळीवर नव्हे तर घराघरात वाड्या-खेड्यात पोहोचली आहे. खाजगी एजंन्सीची चौकशी लावण्याची आम्हाला गरज नाही, असेही ते म्हणालेत.

पुढे ते म्हणाले, “हा जो युक्तीवाद शिवसेनेकडून होतोय, मला वाटतं हा जनतेच्या मनातला युक्तीवाद मानला जातोय. कारण, शिवसेना प्रमुखांची ही शिवसेना ज्याचं नेतृत्व उद्धव ठाकरे करतात. याच शिवसेनेच्या मागे जनता आहे. गाव पातळीवर शिवसेना स्थापन केलेली आहे. त्यातून मग तालुका, जिल्हा असे सगळे युनिट तयार झाले आणि ती मिळून शिवसेना निर्माण झालेली आहे. फक्त आमदार आणि खासदार मिळून शिवसेना निर्माण होत नाही.”

महत्वाच्या बातम्या :

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.