Upcoming SUV Launch | भारतामध्ये लवकरच लाँच होणार ‘या’ SUV कार

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Upcoming SUV Launch | टीम महाराष्ट्र देशा: ऑटो एक्सपो 2023 (Auto Expo 2023) मध्ये विविध कार उत्पादक कंपन्यांनी आपल्या गाड्या सादर केल्या आहे. यामधील अनेक मॉडेल्स या वर्षाच्या अखेरीस बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे. कारण भारतीय बाजारामध्ये दिवसेंदिवस एसयूव्ही (SUV) कारचे ट्रेंड वाढत चालले आहे. भारतीय बाजारामध्ये पुढील एसयूव्ही मॉडेल्स लवकरच लाँच होऊ शकतात.

मारुती सुझुकी जिमनी

मारुती सुझुकीने ऑटो एक्सपो 2023 मध्ये 5-दरवाज्यांची जिमनी लाइफस्टाइल एसयूव्ही सादर केली आहे. कंपनीने या कारची बुकिंगही सुरू केली आहे. या गाडीमध्ये अनेक आकर्षक फीचर्स उपलब्ध आहे. यामध्ये स्मार्टप्ले प्रो+ इन्फोटेनमेंट सिस्टम, वायरलेस ऍपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो आणि अर्कामिन साउंड सिस्टम मिळते. या वाहनात तुम्ही 6 एअरबॅग्ज, हिल होल्ड असिस्टसह ESP, हिल डिसेंट कंट्रोल, रियर व्ह्यू कॅमेरा फीचर्स उपलब्ध आहे.

मारुती फ्रँक्स

मारुतीची ही कार पुढच्या काही महिन्यांमध्ये भारतीय बाजारात लाँच होऊ शकते. कंपनीने या कारचे देखील बुकिंग सुरू केले आहे. ही कार NEXA डीलरशिपद्वारे विकली जाणार आहे. या कारमध्ये स्मार्ट हायब्रीड तंत्रज्ञानासोबतच 1.2L पेट्रोल आणि 1.0L टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन पर्याय उपलब्ध आहे. या कारमध्ये 5-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड टार्क कन्वर्टर ऑटोमॅटिक पर्याय उपलब्ध असू शकतो.

ह्युंडाई मायक्रो एसयूव्ही

ह्युंडाई मोटर लवकरच भारतात नवीन मायक्रो एसयूव्ही लाँच करणार आहे. या एसयूव्हीचे कोड नेम Ai3 आहे, जे K1 या प्लॅटफॉर्मवर डिझाईन करण्यात आले आहे. ज्या एसयूव्हीमध्ये 1.2L NA पेट्रोल इंजिन उपलब्ध असू शकते. हे इंजिन मॅन्युअल आणि AMT गिअर बॉक्स पर्यायांसह ऑफर केले जाऊ शकते.

महत्वाच्या बातम्या