IND vs NZ | बुमराह नाही, तर ‘हा’ खेळाडू आहे रोहितचा फेवरेट गोलंदाज

IND vs NZ | हैदराबाद: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना आज हैदराबादमध्ये खेळला जात आहे. या मालिकेसाठी दोन्ही संघांनी जोरदार तयारी केली आहे. न्यूझीलंडविरुद्ध मालिका सुरू होण्याआधी भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेमध्ये 3-0 ने विजय मिळवला आहे. टीम इंडिया आता न्यूझीलंडविरुद्ध मैदानात उतरणार आहे. सामना सुरू होण्याआधी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) ने पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेमध्ये रोहित शर्माने एका भारतीय गोलंदाजाचे मन भरून कौतुक केले आहे.

टीम इंडियातील वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bhumrah) दुखापतीमुळे गेले अनेक दिवस मैदानापासून दूर आहे. अशा परिस्थितीत बुमराहच्या जागी दुसरा खेळाडू रोहित शर्माचा फेवरेट गोलंदाज बनला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेमध्ये रोहित शर्माने मोहम्मद सिराज (Mohommad Siraj) चे कौतुक केले. रोहित म्हणाला, “सिराजने गेल्या दोन वर्षात गोलंदाजीत अनेक बदल केले आहे. तो आता भारतीय संघासाठी खूप महत्त्वाचा आहे.” कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड मोहम्मद सिराजच्या कामगिरीवर खूप खुश आहे. अशा परिस्थितीत हा गोलंदाज विश्वचषक 2023 मध्ये देखील खेळणार आहे.

सिराजचे कौतुक करताना रोहित शर्मा म्हणाला, “सिराजने गेल्या दोन वर्षात संघासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. तो सध्या संघासाठी खूप महत्त्वाचा खेळाडू बनला आहे. म्हणून तुम्ही त्यांना कसे सांभाळत आहात ही सर्वात महत्त्वाची बाब आहे. दोन वर्षात त्याने गोलंदाजीत बरीच सुधारणा केली आहे. ही संघासाठी खूप चांगली बाब आहे.”

श्रीलंकेविरुद्ध झालेल्या मालिकेमध्ये भारतीय संघात मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी आणि उमरान मलिक हे महत्त्वाचे वेगवान गोलंदाज होते. त्याचबरोबर या मालिकेमध्ये लेगस्पिनर युजवेंद्र चहलचा देखील समावेश होता. कुलदीप यादव आणि चहल यांच्याबद्दल बोलताना रोहित शर्मा म्हणाला, “हे दोन्ही खेळाडू संघासाठी खूप महत्त्वाचे आहे. कारण हे दोघेही संघाला आवश्यक असलेली स्थिरता देऊ शकतात. पण एकाच वेळी दोन्ही लेगस्पिनरला संघात स्थान देता येत नाही.

महत्वाच्या बातम्या

Back to top button