Sanjay Raut | “राज्यात बदला आणि सूडाचं राजकारण, फडणवीस असं काही करतील असं…”- संजय राऊत

Sanjay Raut | मुंबई : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या जयंतीदिनी म्हणजेच 23 जानेवारीला विधीमंडळात त्याचं तैलचित्र लावण्यात येणार आहे. बाळासाहेब ठाकरे तैलचित्र अनावरण कार्यक्रमाच्या निमंत्रणपत्रिकेत उद्धव ठाकरेंचे (Uddhav Thackeray) नाव नाही. यावरुन ठाकरे गटाने आक्षेप घेतला आहे. खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे सरकारवर सडकून टीका केली आहे.

“सरकार हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचं तैलचित्र लावत आहे आणि त्यांचे चिरंजीव जे राज्याचे मुख्यमंत्रीही होते, त्यांना सन्मानाने बोलवत नाही. याचा अर्थ तुमचं राजकारण सुरू आहे. उद्धव ठाकरे म्हणातात की, ‘राज्यात बाप पळवणारी टोळी आली आहे’, यात तथ्य आहे. आम्ही जेव्हा सावरकरांचे तैलचित्र लावलं होतं, तेव्हा आम्ही त्यांच्या नातेवाईकांना आमंत्रित केलं होतं. ही या राज्याची परंपरा राहिली आहे. मात्र, राज्य सरकारकडून कोणत्याही परंपरा पाळल्या जात नाहीत, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

“देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) असं काही करतील, असं वाटत नाही. ते बदला घेतात की नाही, हे मी सांगू शकत नाही. मात्र, महाराष्ट्रात बदला आणि सूड घेण्याचं राजकारण सुरू आहे”, अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिली आहे.

“तैलचित्रामागे नेमकं काय राजकारण आहे, हे वेगळं सांगायची गरज नाही”, असेही संजय राऊत म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या :

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.