Nana Patole | “दुसऱ्यांची घर फोडणं ही भाजपची परंपराच”; नाना पटोलेंचा रोख फडणवीसांकडे

Nana Patole | नाशिक : नाशिक पदवीधर निवडणुकीत काँग्रेसच्या सत्यजित तांबेच्या (Satyajeet Tambe) उमेदवारीवरुन भाजप आणि काँग्रेसमध्ये मोठं वाकयुद्ध सुरु आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी यावरुन भाजपवर पुन्हा एकदा सडकून टीका केली आहे.

“भाजपने घर फोडण्याचं काम केलं आहे. घर फोडणं ही त्यांची आता परंपराच झाली आहे. नाशिकमध्ये त्यांना स्वतःचा उमेदवार देता आला नाही, यावरुन भाजपची काय स्थिती झाली, हे लक्षात येतं. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात सुशिक्षित लोक मतदान करत असतात. राज्यात सध्या बेरोजगारी, महागाई वाढलेली आहे. सुशिक्षित बेरोजगार लोक मतदानातून याबाबत भाजपला उत्तर देतील”, असे नाना पटोले म्हणाले आहेत.

“पाचही जागांबाबत स्पष्टीकरण यावे, यासाठी आज दुपारी महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. त्यावेळी पाचही जागांबाबत चित्र स्पष्ट होईल. या निवडणुकीत कुणाचा पराभव होणार हे 30 तारखेला मतदानाच्या दिवशी ठरेल. निवडणुकीचा निकाल 2 फेब्रुवारी रोजी लागणार आहे, तेव्हा सर्वांना कळून येईलच”, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.