Sushma Andhare | “भगव्या रंगाची साडी घालून आमच्या नवनीत अक्कानी…”; सुषमा अंधारेंची सडकून टीका 

Sushma Andhare | बीड : सध्या महिलांच्या कपड्यांवरुन राज्याच्या राजकारणात अनेक टीका-टिपण्णी सुरु आहे. भगव्या बिकनीमुळे अभिनेत्री दिपिका पादुकोण त्यानंतर फॅशन आयकॉन उर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यातील तोकड्या कपड्यांवरुन सुरु असलेला वाद यामुळे महिलांच्या कपड्यांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे.

या पार्श्वभूमीवर बोलताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्या म्हणाल्या, “सध्या पठाण नावाच्या चित्रपटातील एका गाण्यावरुन बराच वाद, चर्चा होतेय. दिपिका पादुकोणच्या त्या गाण्यात खान नावाचा कलाकार आहे म्हणून गाण्यावर आक्षेप घेतला जातोय का?”

“पण तशाच भगव्या रंगाची साडी घालून आमच्या नवनीत अक्कानी पण डान्स केला आहे. नवनीत अक्काच्या त्या गाण्याची चर्चाच होत नाही. का बरं? नवनीत अक्काच्या नावापुढे खान, शेख, तांबोळी असं काहीच नाही म्हणून का?”, असा खोचक सवाल सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी भाजपला केला आहे.

दरम्यान, योगगुरू रामदेव बाबा यांनी काही दिवसांपूर्वी महिलांच्या कपड्यावरून आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. “महिलांनी कपडे परिधान केले नाही, तरीही त्या चांगल्या दिसतात”, असे आक्षेपार्ह वक्तव्य रामदेव बाबांनी केले होते. याच प्रकारावरून ठाकरे सुषमा अंधारे यांनी सत्ताधारी पक्षावर चांगलीच टीकेची झोड उठवली आहे. “रामदेव बाबांवर विनयभंगाचा गुन्हा का दाखल झाला नाही?” असा संतप्त सवालही यावेळी सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे.

महत्वाच्या बातम्या :