Weather Update | ‘या’ तारखेपासून होणार थंडीचा कडाका कमी, जाणून घ्या हवामान अंदाज

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: सध्या देशात विविध ठिकाणी थंडी (Cold) ची लाट पसरली आहे. थंडीचा कडाका वाढल्यामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाल्याचे दिसून आले आहे. उत्तर भारत आणि उत्तर-पश्चिम भारतात थंडीचा जोर अधिक आहे. त्याचबरोबर राज्यातही चांगलीच हुडहुडी वाढली आहे. त्यामुळे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी जागोजागी शेकोट्या पेटलेल्या दिसत आहेत. अशा परिस्थितीत हवामान खात्याने दिलासादायक माहिती दिली आहे. उत्तर आणि पश्चिम भारतामध्ये लवकरच थंडीची तीव्रता कमी होण्याची शक्यता हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.

थंडीचा जोर अधिकच वाढला आहे. या वाढत्या थंडीचा परिणाम थेट सर्वसामान्यांच्या आरोग्यावर होत आहे. दिवसेंदिवस थंडीत वाढ होत चालली आहे. अशा परिस्थितीत हवामान खात्याने जनसामान्यांना दिलासा देणारी बातमी दिली आहे. येत्या 19 जानेवारीपासून उत्तर भारत आणि पश्चिम भारतात थंडी कमी होण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. हवामान खात्याने दिलेल्या या अंदाजामुळे नागरिकांना थोडा दिलासा मिळाला आहे.

देशाची राजधानी दिल्लीसह पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या काही भागांमध्ये थंडीची लाट कायम आहे. 17 ते 19 जानेवारी दरम्यान उत्तर प्रदेश आणि बिहारच्या काही भागांमध्ये थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. तर, 18 जानेवारीला पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश आणि राजस्थान या भागात दाट धुके पडण्याची शक्यता देण्यात आली आहे.

दरम्यान, राज्यात देखील अनेक ठिकाणी कमाल आणि किमान तापमानात घट झालेली दिसून आली आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा 10 अंश सेल्सिअसच्या खाली नोंदवण्यात आला आहे. पहाटेच्या वाढत्या थंडीमुळे मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांच्या संख्येत मोठी घट दिसून आली आहे. तर थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक जागोजागी शेकोट्यांचा आधार घेताना दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.