Ambadas Danve | “फक्त आमदार आणि खासदार मिळून…”; अंबादास दानवेंची शिंदे गटावर बोचरी टीका 

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ambadas Danve | मुंबई :  शिवसेना आणि धनुष्यबाण कुणाकडे जाणार याचा निर्णय आजही लागला नाही. केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये सुरू असलेली ही सुनावणी आता शुक्रवारी, 20 जानेवारीला होणार आहे. शिवसेना उद्धव ठाकरेंची की एकनाथ शिंदे गटाची यावर केंद्रीय निवडणूक आयोगात आज महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली.

या सुनावणीच्या वेळी ठाकरे गटाकडून अनिल परब आणि सुभाष देसाई हे उपस्थित होते. या पार्श्वभूमीवर विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी प्रतिक्रिया देताना शिंदे गटावर निशाणा साधला. फक्त आमदार आणि खासदार मिळून शिवसेना निर्माण होत नसल्याचं त्यांनी म्हंटल आहे.

ते म्हणाले, “हा जो युक्तीवाद शिवसेनेकडून होतोय, मला वाटतं हा जनतेच्या मनातला युक्तीवाद मानला जातोय. कारण, शिवसेना प्रमुखांची ही शिवसेना ज्याचं नेतृत्व उद्धव ठाकरे करतात. याच शिवसेनेच्या मागे जनता आहे. गाव पातळीवर शिवसेना स्थापन केलेली आहे. त्यातून मग तालुका, जिल्हा असे सगळे युनिट तयार झाले आणि ती मिळून शिवसेना निर्माण झालेली आहे. फक्त आमदार आणि खासदार मिळून शिवसेना निर्माण होत नाही.”

पुढे ते म्हणाले, आमच्यासारखे शिवसैनिक लोकांच्या घऱोघरी जाऊन त्यांना शिवसेनेत सहभागी करून घेतात. कोणतीही खासगी एजन्सी पैसे देऊन लावण्याची आम्हाला गरज पडत नाही. खऱ्या अर्थाने नैसर्गिकरित्या जी महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील शिवसेना आहे, ती उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातच काम करते.”

महत्वाच्या बातम्या :