Share

Balasaheb Thackeray | ‘बाळासाहेब ठाकरे तैलचित्र अनावरण सोहळा’; उद्धव ठाकरेंचं नाव आमंत्रण पत्रिकेतून वगळलं

Balasaheb Thackeray | मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) तैलचित्र अनावरण सोहळा येत्या 23 जानेवारी 2023 रोजी पार पडणार आहे. या सोहळ्याची आमंत्रण पत्रिका देखील नुकतीच प्रकाशित झाली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्र अनावरण सोहळ्याच्या आमंत्रण पत्रिकेमध्ये ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे नाव नसल्याने आता अनेक चर्चांना उधाण आले आहे.

या सोहळ्याच्या आमंत्रण पत्रिकेत प्रोटोकॉलनुसार शासकीय पदांवर असलेल्या व्यक्तींचीच नावे छापण्यात आली असल्याचं सांगितलं जात आहे. ज्यामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, विधानसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष, विधानपरिषद सभापती आणि उपसभापती यांच्या नावांचा समावेश आहे.

“आम्ही ठाकरे कुटुंबातील सगळ्यांनाच सन्मानपूर्वक आमंत्रित केले आहे”, असे विधानसभा अध्यक्षांकडून सांगण्यात आले आहे. परंतु व्यासपीठावर नेमकं कोण कोण असणार हे अद्याप सांगितलेलं नाही. पुढील एक दोन दिवसात ठाकरे कुटुंबियांना, आमदार-खासदारांना तसंच विविध क्षेत्रातील मान्यवरांना आमंत्रण पाठवलं जाणार आहे.

महत्वाच्या बातम्या :

Balasaheb Thackeray | मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) तैलचित्र अनावरण सोहळा येत्या 23 जानेवारी 2023 रोजी पार पडणार …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics