Shubhangi Patil | “विजयाची रॅली ‘मातोश्री’वर घेऊन जाणारच”- शुभांगी पाटील 

Shubhangi Patil | नाशिक : नाशिक पदवीधर निवडणुकीत रोज नवा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. नाशिकचे मावळते आमदार डॉ. सुधीर तांबे यांना काँग्रेसने उमेदवारी दिली होती. पण सुधीर तांबे यांनी काँग्रेसकडून अर्ज भरला नाही, त्यानंतर सत्यजीत तांबे यांनी अपक्ष अर्ज भरला.

तर, दुसरीकडे धुळे येथील भाजपच्या कार्यकर्त्या असलेल्या शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांना शिवसेना ठाकरे गटाने पाठिंबा दिला. त्यामुळे नाशिकमध्ये सत्यजित तांबे विरुद्ध शुभांगी पाटील, अशी थेट लढत होणार आहे. दरम्यान, या निवडणुकीत आपलाच विजय होईल, असा विश्वास शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांनी व्यक्त केला आहे.

त्या म्हणाल्या, “उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचे मी आभार मानते की त्यांनी एका सामान्य घरातील शेतकऱ्याच्या मुलीवर विश्वास ठेवला. मी हा विश्वास सार्थ ठरवण्याचा प्रयत्न करेन आणि विजयानंतर मी मातोश्रीवर रॅली घेऊन जाणार आहे. “मी एक महिला शिक्षक उमेदवार असून गेल्या दहा वर्षापासून शिक्षकांचे अनेक प्रश्न, विनावेतन, पेन्शन, पदभरती असेल, विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील, अनेक हजारो प्रश्न सोडून सोडवले आहे, त्यामुळे सगळ्या शिक्षक संघटना पाठिंबा देतील, असं शुभांगी पाटील यावेळी बोलताना म्हणाल्या.

नाशिक पदवीधर मतदार संघातील तरुणांचे अनेक प्रश्न आहे. ते सोडवण्यचा माझा प्रयत्न आहे. या मतदार संघात नगर जिल्ह्यात सर्वाधीक पदवीधर आहे आणि नगर जिल्हा माझे माहेर आहे. तेथील सर्व पदवीधर भाऊ एका बहिणीला माहेरची साडी म्हणून ३० तारखेला मतदान करतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

महत्वाच्या बातम्या :

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.