Honda Activa Smart | ‘या’ दिवशी लाँच होणार Honda Activa Smart

Honda Activa Smart | टीम महाराष्ट्र देशा: देशातील आघाडीची दुचाकी उत्पादक कंपनी होंडा (Honda) नेहमी आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन फीचर्ससह वाहने लाँच करत असते. त्यामुळे कंपनीची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अशा परिस्थितीत कंपनी लवकरच आपली होंडा ॲक्टिवा स्मार्ट (Honda Activa Smart) स्कूटर लाँच करणार आहे. या महिन्यातील 23 तारखेला कंपनी ही स्कूटर बाजारामध्ये सादर करणार आहे. कंपनीची ही स्कूटर ॲक्टिवाची स्मार्ट आवृत्ती आहे. होंडाची ॲक्टिवा ही देशातील सर्वाधिक विकली जाणारी पेट्रोल स्कूटर आहे.

होंडा ॲक्टिवा स्मार्टचे वजन सध्याच्या ॲक्टिवापेक्षा सुमारे एक किलो कमी असू शकते. कंपनीने या स्कूटरबद्दल अद्याप अधिक माहिती दिलेली नाही. या स्कूटरच्या लाँचच्या वेळी कंपनी याबद्दल माहिती देणार आहे. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या व्हेरीयंटमध्ये इंजिन 7.79hp पॉवर निर्माण करते. तर, या नवीन स्कूटरमध्ये इंजिन 7.84hp पॉवर जनरेट करू शकतो.

या स्कूटरच्या नावातील स्मार्ट हा शब्द अँटी-थेफ्ट सिस्टीमसाठी असू शकतो. ही स्कूटर होंडा सिक्युरिटी इग्रीशन सिस्टीम किंवा H.I.S.S. ची आवृत्ती असू शकते. या दोन्ही गोष्टी कंपनीच्या महागड्या बाईकमध्ये आढळून येतात.

होंडाची ही नवीन स्कूटर टीव्हीएसच्या ज्यूपिटरसोबत स्पर्धा करू शकते. टीव्हीएसच्या या गाडीची किंमत 73,097 आहे. तर, या स्कूटरच्या टॉप मॉडेलची किंमत 87,923 रुपये आहे. ही गाडी बाजारामध्ये सहा प्रकारांमध्ये आणि सोळा रंगांच्या पर्यायात उपलब्ध आहे. टीव्हीएसच्या या स्कूटरमध्ये 109.7cc BS6 इंजिन उपलब्ध आहे. हे इंजिन 7.77bhp पॉवर आणि 8.8Nm टार्क निर्माण करू शकते.

महत्वाच्या बातम्या

Back to top button