Share

Urfi Javed | उर्फीच्या जीवाला धोका? महिला आयोगाचे थेट पोलीस आयुक्तांना पत्र

🕒 1 min read Urfi Javed | मुंबई: फॅशन आयकॉन उर्फी जावेद (Urfi Javed) आणि भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांचा वाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या वादाने आता एक विचित्र वळण घेतले आहे. उर्फीने या प्रकरणानंतर आपल्या जीवाला धोका असल्याची भीती व्यक्त केली होती. त्यानंतर तिने यासंदर्भात महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. … Read more

Published On: 

🕒 1 min read

Urfi Javed | मुंबई: फॅशन आयकॉन उर्फी जावेद (Urfi Javed) आणि भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांचा वाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या वादाने आता एक विचित्र वळण घेतले आहे. उर्फीने या प्रकरणानंतर आपल्या जीवाला धोका असल्याची भीती व्यक्त केली होती. त्यानंतर तिने यासंदर्भात महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. महिला आयोगाने तिच्या या तक्रारीची त्वरित दखल घेतली आहे.

उर्फी जावेद प्रकरणी महिला आयोगाने थेट मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहिले आहे. महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी उर्फीच्या तक्रारीची नोंद घेत पोलीस आयुक्तांना पत्र पाठवलं आहे. या प्रकरणाची सविस्तर चौकशी व्हावी आणि त्याचा अहवाल महिला आयोगाला पाठवावा, असा आदेश यामध्ये महिला आयोगाने दिला आहे.

“मी सिनेसृष्टी संबंधित असलेल्या फॅशन इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे. माझं राहणीमान आणि दिसणं व्यावसायिक दृष्ट्या आवश्यक आहे, असं म्हणतं उर्फी जावेदने राज्य महिला आयोगाकडे तक्रार नोंदवली होती. “चित्रा वाघ मला मारण्याची धमकी देत आहे. त्यामुळे माझ्यावर जीवघेणा हल्ला होऊ शकतो,” अशी भीती देखील उर्फीने व्यक्त केली होती.

उर्फीच्या तक्रारीची दखल घेत राज्य महिला आयोगाने पोलीस आयुक्तांना पत्र पाठवले आहे. “भारतीय राज्यघटना प्रत्येक भारतीयाला मुक्त संचाराचा अधिकार देते. मुंबईसारख्या शहरात असुरक्षित वाटणे ही एक गंभीर बाब आहे. त्यामुळे पोलीस आयुक्तांनी यावर त्वरित कारवाई करावी आणि कार्यवाहीचा अहवाल राज्य महिला आयोगास सादर करावा,” अशा सूचना महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना दिल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या

[emoji_reactions]

Entertainment Maharashtra Politics

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या