Share

Sanjay Raut | “शिवसेना कोणाची हा प्रश्न महाराष्ट्रात तरी उपस्थित होत नाही”- संजय राऊत

Sanjay Raut | मुंबई : ‘शिवसेना (Shivsena) हा पक्ष माझ्या वडिलांचा, बाळासाहेब ठाकरे यांचा आहे’, हे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) वारंवार सांगत आले आहेत. या पार्श्वभूमीवरुन उद्धव ठाकरेंना शिंदे गट आणि भाजपकडून अनेकदा घेरण्यात आले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगासमोर (Election Commission) झालेल्या मागील सुनावणीत यावरून प्रश्नचिन्ह उभ करण्यात आलं आहे. आजच्या सुनावणीत देखील हाच मुद्दा … Read more

Published On: 

Sanjay Raut | मुंबई : ‘शिवसेना (Shivsena) हा पक्ष माझ्या वडिलांचा, बाळासाहेब ठाकरे यांचा आहे’, हे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) वारंवार सांगत आले आहेत. या पार्श्वभूमीवरुन उद्धव ठाकरेंना शिंदे गट आणि भाजपकडून अनेकदा घेरण्यात आले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगासमोर (Election Commission) झालेल्या मागील सुनावणीत यावरून प्रश्नचिन्ह उभ करण्यात आलं आहे. आजच्या सुनावणीत देखील हाच मुद्दा महत्त्वाचा ठरणार आहे. यावरुन शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शिवसेना फक्त ठाकरेंचीच असल्याचं पुन्हा एकदा सांगितलं आहे.

“शिवसेना कुणाची हा तांत्रिक मुद्दा निवडणूक आयोगाकडे जाऊ शकतो. निवडणूक आयोगाने मागच्या काळात ज्या पद्धतीने निर्णय दिले, यावरून काय होतंय याचा अंदाज येतोय. शिवसेना कुणाची हा प्रश्न महाराष्ट्रात तरी उपस्थित होत नाही. शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आहे तीच शिवसेना. शिवसेना एकच आहे” अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगसमोर आज शिवसेना पक्ष आणि शिवसेनेच्या चिन्हाबाबत महत्त्वाची सुनवाणी होणार आहे. दुपारी चार वाजेच्या सुमारास सुनावणीला सुरुवात होईल. उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पक्ष हा बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर अवैधरित्या मिळवल्याचा दावा शिंदे गटाच्या वकिलांनी मागील सुनावणीच्या वेळी केला आहे.

येत्या 23 जानेवारी रोजी उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदाची मुदत संपत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेतील प्रतिनिधी सभेतील सदस्यांची निवडणूक घेण्याची परवानगी उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. परवानगी नाही दिली तर शिवसेना प्रमुख पदाची मुदत वाढ द्यावी, अशी मागणी उद्धव ठाकरेंच्या वतीने करण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही